अभिनेता, गायक आणि राजकारणी मनोज तिवारीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेमध्ये राहणारा मनोज पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे. त्यांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अभिनेत्याच्या घरी लवकरच एका लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे.
चाहत्यांना याची माहिती अभिनेत्याने स्वतः आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली आहे. अभिनेत्याने सुरभीच्या डोहाळजेवणाचे फोटो आणि व्हिडीओ शेयर केले आहेत. त्याचबरोबर त्याने लिहिले आहे कि काही आनंदाचे क्षण आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. पण त्यांना अनुभवू शकतो.
मनोज तिवारीने २१ नोव्हेंबर रोजी आपल्या इंस्टाग्राम हँडलवर बेबी शॉवरची एक झलक दाखवली. हा व्हिडीओ आल्यानंतर मित्र आणि त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओमध्ये लाल लेहेंग्यामध्ये सुरभी आपले बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.
मनोज तिवारीने १९९९ मध्ये राणीसोबत लग्न केले होते. त्याला एक मुलगी जिचे नाव रिती झाली होती. २०१२ मध्ये राणी आणि मनोजचा घटस्फोट झाला आणि नंतर रितीने पिता मनोज तिवारीला दुसरे लग्न करण्यासाठी तयार केले. एप्रिल २०२० मध्ये मनोज आणि सुरभीने लग्न केले.
सुरभीने २०२१ मध्ये एका मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव रितीने सान्विका ठेवले होते. रिती आणि सान्विका मनोज तिवारीच्या हृदयाचा तुकडा आहेत. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले होते कि रिती आणि सुरभीचे नाते खूप मैत्रीपूर्ण आहे आणि आम्ही अनेकदा एकत्र सुट्टी घालवतो.
View this post on Instagram