मनोज बाजपेयीची आई गीता देवी दीर्घकाळ आजारी असल्यामुळे दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. आज त्यांचे निधन झाला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर अभिनेता मनोज बाजपेयी आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे खचले आहे.
माहितीनुसार अभिनेत्याची आई अनेक आजारांनी ग्रस्त होती, ज्यानंतर त्यांना दिल्लीच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांची प्रकृती जास्त खराब झाल्यानंतर त्यांचे निधन झाले.
आईच्या निधनानंतर मनोज बाजपेयी आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे खचले आहे. अभिनेता आपल्या कुटुंबाला सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या एक आठवड्यापासून गीता देवीवर पुष्पांजली मेडिकल सेंटर आणि मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. ज्यानंतर गेल्या दिवसांमध्ये आपल्या बीजी शेड्युलमधून वेळ काढून अभिनेता आईला भेटण्यासाठी हॉस्पीटलमध्ये पोहोचला होता.
मनोज बाजपेयीच्या आईच्या निधनाची बातमी अशोक पंडित यांनी ट्वीट करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे कि, मनोज बाजपेयी तुमच्या आईच्या निधनानंतर आमच्या संवेदना तुमच्या सोबत आहेत, ओम शांती. अभिनेत्याने गेल्या वर्षी आपल्या वडिलांना गमवले होते. तो आईवडिलांच्या खूपच जवळ होता, अनेक प्रसंगी तो आपल्या आईचे शब्द बोलताना पाहायला मिळायचा.
Our heartfelt condolences to you and your entire family @BajpayeeManoj on the sad demise of your Aadarniya mother .
ओम शांति !
🙏— Ashoke Pandit (@ashokepandit) December 8, 2022