HomeBollywoodसंगीतसृष्टी हादरली ! प्रसिद्ध गायकाचे दुखद नि धन, 'अल्लाह के बंदे' गाणं...

संगीतसृष्टी हादरली ! प्रसिद्ध गायकाचे दुखद नि धन, ‘अल्लाह के बंदे’ गाणं गात घेतला अखेरचा श्वास, कैलाश खेर देखील झाला भावूक…

प्रसिद्ध मणिपूर सिंगर सुरेन युमनामने दीर्घ आजारानंतर अखेरचा श्वास घेतला. सिंगर फक्त ३५ वर्षाचा होता. तो बऱ्याच दिवसांपासून लिवर संबंधी आजाराशी झुंज देत होता. सुरेन युमनामने आपल्या उपचारादरम्यान कधी हिंमत हारली नाही. तो नेहिमी उत्साही राहिला. हा त्याचा शेवटचा व्हिडीओ राहिला. सिंगर युमनाम हॉस्पीटलच्या बेडवर मशीनमध्ये वेढलेला असून देखील त्याने दमदार आवाजामध्ये कैलाश खेरचे ‘अल्लाह के बंदे’ गाणे म्हणत अखेरचा श्वास घेतला.

सुरेन युमनामच्या निधनानंतर इमोशनल झालेल्या कैलाश खेरने त्याचा गाणे म्हणतानाचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. कैलाश खेरने व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, मणिपूरचा प्रिय आणि प्रसिद्ध सिंगर सुरेन युमनाम हॉस्पिटलच्या बेडवर अल्लाह के बंदे गाणे गाताना.

काल मणिपूरमध्ये आजारामुळे हसतमुखाने जगण्याचा शेवटचा संदेश देत त्याने जगाचा निरोप घेतला. कैलाश खेरने पुढे लिहिले आहे कि खूपच दुख झाले जेव्हा मी हा व्हिडीओ पाहिला आणि त्याचा आवाज ऐकला. कशाप्रकारे तो आणखीन एक दिवस जगण्यासाठी उत्सुक आहे.

त्याचबरोबर माझ्या आनंदाला काहीच पारावार राहिला नाही जेव्हा मला हे माहिती झाले कि मणिपूरच्या लोकांनी त्याच्या उपचारासाठी ५८,५१,२७० रुपये जमा केले आणि त्याच्या उपचारामध्ये आपले सर्वश्रेष्ठ दिले. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. ईश्वर मणिपूरच्या लोकांना आशीर्वाद देवो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kailash Kher (@kailashkher)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts