HomeBollywood":कमी फीस देऊन कवळ्या मुलींसोबत..." ८० च्या दशकामधील अभिनेत्री मंदाकिनीने उघड केले...

“:कमी फीस देऊन कवळ्या मुलींसोबत…” ८० च्या दशकामधील अभिनेत्री मंदाकिनीने उघड केले बॉलीवूडचे काळे सत्य…

८० च्या दशकातील अभिनेत्री आणि फिल्म राम तेरी गंगा मैली मधून रातोरात स्टार बनलेली मंदाकिनी यांनी अलीकडेच बॉलीवूड इंडस्ट्री ची गुपिते उघडली आहेत. त्यांनी एका मुलाखतीत बॉलीवूडचे काळे सत्य सांगितले की त्यांच्या वेळी अभिनेत्रींना कमी लक्ष दिले जात असे आणि त्यांचा चुकीच्या मार्गासाठी वापर केला जात असे.

त्यांनी फी बद्दल सांगितले की जेव्हा त्यांनी इंडस्ट्री मध्ये पाउल ठेवले होते तेंव्हा अभिनेत्रींना फक्त एक ते दीड लाख रुपये फी मिळत असे. त्यांनी हे देखील सांगितले की अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रींना खूपच कमी महत्व देत असत. राज कपूर यांच्या पिक्चर मध्ये काम केल्यानंतर मंदाकिनी लोकप्रिय झाल्या, परंतु त्या जास्त हिट चित्रपट करू शकल्या नाहीत. एवढेच नाही तर काही पिक्चर मध्ये काम केल्या नंतर त्या रातोरात अचानक गायब झाल्या होत्या.

एका मुलाखतीत मंदाकिनी यांनी सांगितले की आमच्या वेळी अभिनेत्रींना जास्त मागणी नसे. त्यांना पिक्चर मध्ये फक्त गाणे म्हणण्यासाठी नाहीतर रोमान्स करण्यासाठी घेतले जात असे. पूर्ण पिक्चर मध्ये काम करून देखील अभिनेत्रींना हिरो पेक्षा कमी फी दिली जात असे. त्यांनी सांगितले की फक्त लाख-दीड लाख फी वर त्यांना समाधान मानावे लागते.

तुम्ही पहिले असेलच की अलीकडेच मंदाकिनी एका म्युझिक विडीओ मां ओ मां मध्ये पाहायला मिळाल्या. या विडीओ मध्ये त्या आपल्या मुलासोबत दिसल्या. मंदाकिनी यांनी २६ वर्षानंतर पुनरागमन केले आहे त्यावर त्यांनी सांगितले की त्यांची मुले खूपच लहान होती आणि त्यावेळी त्यांना फक्त मुलांच्या संगोपनावर लक्ष द्यायचे होते, परंतु आता ते मोठे झाले आहेत आणि मी आता परत येण्याचा विचार करू शकते.

मंदाकिनी यांनी ८० च्या दशकात आलेली पिक्चर राम तेरी गंगा मैली मध्ये खुपच बोल्ड सीन देवून फिल्म इंडस्ट्री मध्ये धुमाकूळ घातला होता. पिक्चर प्रदर्शित झाल्या बरोबर त्या सुद्धा स्टार झाल्या. त्यांच्या जवळ पिक्चर ची रांग लागली होती. त्यांनी त्यांच्या काळातील सगळ्या सुपरस्टार सोबत काम केले आहे परंतु त्या जास्त हिट पिक्चर करू शकल्या नाहीत. नंतर अचानक त्यांचे नाव अंडर वर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम सोबत जोडले गेले, आणि त्यांचा फिल्मी करिअर कमी होत गेले. एक दिवस अचानक त्या इंडस्ट्री मधून गायब झाल्या. मंदाकिनी शेवटच्या १९९६ मध्ये आलेल्या जोरदार पिक्चर मध्ये दिसल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts