अर्चना जोगळेकर ९० च्या दशकातील खूपच चर्चित अभिनेत्रीचे नाव आहे जी केवळ अभिनयासाठीच नाही तर नृत्य कौशल्यासाठी देखील खूप लोकप्रिय होती. अर्चनाने त्यादरम्यान अनेक प्रसिद्ध टीवी मालिका – किस्सा शांती का, कर्णभूमी आणि फुलवती इत्यादी मध्ये काम केले आहे. या टीवी मालिकांच्यामुळे अर्चना लोकांच्यात खूपच प्रसिद्ध झाल्या होत्या.
फक्त हिंदी च नाही तर अर्चना जोगळेकर ने प्रादेशिक सिनेमामध्ये देखील काम केले आहे. प्रत्यक्षात, आज आम्ही तुम्हाला ९० च्या दशकातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जीवनाशी जोडलेल्या घटनांच्या बद्दल सांगणार आहोत ज्यामुळे खूप चर्चा उठल्या होत्या.
वास्तविक हि संपूर्ण घटना एका उडिया चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान घडली आहे. मिडिया रिपोर्टनुसार वर्ष १९९७ मध्ये अर्चना जेव्हा एका उडिया चित्रपटाचे चित्रीकर करत होती तेव्हा एका व्यक्तीने अभिनेत्रीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तथापि, योग्यवेळी अर्चना त्या व्यक्तीच्या तावडीतून निसटली आणि कसेतरी तिने स्वतः ला वाचवले.
तर, लोकांनी पकडलेल्या व्यक्तीला नंतर १८ महिन्यांची शिक्षा देण्यात आली. हि तर होती वैयक्तिक बाबतीत, आता तुम्हाला सांगूया अर्चना च्या व्यावसायिक जीवनाबद्दल, तर आम्ही तुम्हाला सांगतो कि अर्चना जोगळेकर यांना नृत्याची खूप आवड आहे.
अभिनेत्रीने नृत्य तिच्या आई आशा जोगळेकर यांच्या कडून शिकल्या आहेत. आशा जोगळेकर स्वतः एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आहेत आणि त्यांनी त्यांची मुलगी अर्चना च्या नावे मुंबई मध्ये ‘अर्चना नृत्यालय’ चालू केले आहे. प्रत्यक्षात, बातमीनुसार करिअर च्या शिखरावर असूनदेखील अर्चनाने बॉलीवूड ला निरोप दिला आणि आता त्या ‘न्यू जर्सी’ अमेरिकेत राहतात आणि तिथेच तिचा नृत्य क्लास चालवतात, तिथे त्या विद्यार्थ्यांना क्लासिकल नृत्याचे प्रशिक्षण देतात.