बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मिडियावर नेहमी सक्रीय राहते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. चाहत्यांना तिने काही फोटो आवडतात तर काही फोटोवर ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होते. अभिनेत्री अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे देखील अनेकवेळा ट्रोल होत असते.
दरम्यान आता पुन्हा एकदा मलायका अरोराला तिच्या आणि अर्जुन कपूरसोबत नात्यामुळे ट्रोल व्हावे लागले आहे. मागच्या काही दिवसांपासून मलायका तिच्या मूव्हिंग इन विथ मलायका शोमुळे खूपच चर्चेमध्ये आहे. शोमध्ये अभिनेत्रीने तिच्या नात्याविषयी देखील मोठे खुलासे केले आहेत.
पण सध्या नवीन वर्षांचा निमित्ताने अभिनेत्रीने अर्जुन सोबत शेयर केलेल्या फोटोमुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. अभिनेत्रीने सोशल मिडियावरून तिचा आणि बॉयफ्रेंड अर्जुन कपूरचा एक रोमँटीक फोटो शेयर केल्यामुळे ती खूपच ट्रोल आहे.
मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुन कपूरसोबतचा एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे. फोटो शेयर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये हॅलो २०२३ असे लिहिले आहे. पण अभिनेत्रीचा हा अंदाज सोशल मिडिया युजर्सला काही रुचलेला दिसत नाही आहे. यावरून युजर्सनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.
एका युजरने मलायकाच्या फोटोवर कमेंट करत लिहिले आहे कि, ज्या वयामध्ये यांची मुले मजा करतात त्या वयामध्ये त्यांची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत मजा घेत आहे. याशिवाय इतर अनेक युजर्सनी मलायकाला-अर्जुनच्या या फोटोवर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.