HomeBollywoodमलायका अरोराच्या अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतरच्या नात्याचा केला खुलासा, म्हणाली; घटस्फोटानंतर तर आम्ही खूपच...

मलायका अरोराच्या अरबाजसोबतच्या घटस्फोटानंतरच्या नात्याचा केला खुलासा, म्हणाली; घटस्फोटानंतर तर आम्ही खूपच…

मलायका अरोरा आणि अरबाज खानचा घटस्फोट होऊन आता ५ वर्षे झाली आहेत. या ५ वर्षांमध्ये दोघेही आपल्या लाईफमध्ये खूपच पुढे गेले आहेत आणि दोघांनी आपला एक नवीन पार्टनर निवडला आहे. तरीही मलायका आणि अरबाजदरम्यानच्या रिलेशनबद्दल चर्चा होत असतात.

यादरम्यान आता मलायका अरोराने एका मुलाखतीदरम्यान तिने तिचा एक्स पती अरबाजसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले कि घटस्फोटानंतर दोघांमधील नाते कसे आहे. मलायकाने जे काही सांगितले ते ऐकल्यानंतर अनेक लोक हैराण झाले आहेत.

मलायका अरोराने एका मुलाखतीमध्ये म्हंटले कि घटस्फोटानंतर तर माझे आणि अरबाजचे नाते पूर्वीपेक्षा खूपच चांगले झाले आहे. आमच्यामध्ये इक्वेशंस अधिक चांगली झाली आहेत आणि कादाठीच आम्ही पूर्वीपेक्षा अधिक समजदार झालो आहोत. मलायका पुढे म्हणाली कि, घटस्फोटानंतर आम्ही आनंदाने आणि शांततेने आमचे आयुष्य घालवत आहोत. इतकेच नाही तर मलायकाने अरबाजला एक चांगली व्यक्ती देखील म्हंटले. तिने मुलाखतीमध्ये पुढे सांगितले कि कधी कधी लोक शानदार असतात पण ते कोणत्याना कोणत्या कारणामुळे एकत्र राहू शकत नाहीत.

मलायकाने अरबाज आणि आपल्या घटस्फोटाबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली कि मी स्वतःला प्रथम स्थान दिले आणि हेच कारण आहे कि आज मी आधीपेक्षा जास्त चांगली व्यक्ती बनली आहे. मुलगा अरहानसोबत देखील माझे नाते चांगले आहे आणि तो सर्व काही पाहू शकतो. तिने म्हंटले, एक्स हसबंड अरबाज खानसोबत देखील माझे नाते चांगले आहे. मी यामुळे खूपच खुश आहे कि मी स्वतःसाठी उभी आहे. यादरम्यान मलायकाने म्हंटले कि महिलांनी नेहमी आपल्या मनाचे ऐकले पाहिजे आणि तेच केले पाहिजे जे त्यांचे मन सांगेल.

मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिप आहे. तर अरबाज खान अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. दोन्ही कापल नेहमी एकत्र स्पॉट होत असतात. मलायका अरोरा आणि अरबाज खानने १९९८ मध्ये लव्ह मॅरेज केले होते. लग्नाच्या अगोदर दोघांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केले होते. असे म्हंटले जाते कि मलायकानेच अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले होते.

१९ वर्षे एकत्र राहिल्यानंतर मलायका-अरबाजमधील नाते बिघडले. दोघांमध्ये मतभेद आणि भांडणे होऊ लागली आणि शेवटी हि गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली. कपलने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मुलगा अरहान मलायकासोबत राहतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts