अभिनेत्री मलायक अरोरा अलीकडे तिच्या रियालिटी शो ‘मुविंग इन विथ मलायका’ ला घेवून खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे. शो चालू होऊन एक आठवडा झालेला आहे. शो मध्ये अभिनेत्रीचा बिनधास्त अंदाज खूपच मनोरंजक आहे. अभिनेत्री या शो च्या माध्यमातून तिच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत गोष्टी आणि रहस्यांबद्दल मोकळेपणाने बोलते. अशातच तिच्या नातेसंबंधाबद्दल देखील खुलासे होत असतात. शो च्या अलीकडील भागामध्ये मलायका ने पाहुणा करण जोहर च्या सोबत तिचा एक्स नवरा अरबाज बद्दल देखील मोकळे पणाने बोलली.
मुविंग इन विथ मलायका च्या नवीन भागामध्ये मलायका ने कुटुंबाबद्दल मोठी गोष्ट सांगितली. करण जोहर ने मलायका चा २०२१ मध्ये झालेल्या अपघाताबद्दल बोलण्यात आले. करण जोहर म्हणाला, ‘मला आठवते कि जेव्हा मी तुला दवाखान्यातून घरी घेवून जाण्यासाठी आलेलो होतो, तेव्हा संपूर्ण कुटुंब तुझ्या सोबत दिसत होते’. त्यावर मलायका म्हणाली कि ती तिच्या कुटुंबातील यादीमध्ये कधीही क्रमांक एक वर येऊ शकत नाही. हि गोष्ट देखील खरी आहे कि मुलगा अरहान मुळे त्यांना माझी काळजी असते, जे चांगले आहे.
शो च्या दरम्यान करण जोहर ने मलायका ला अरबाज आणि त्याची कथित मैत्रीण जॉर्जिया एंड्रीयानी यांच्यातील ब्रेकअप च्या अफवांवर उघडपणे चर्चा केली. करण ने अभिनेत्रीला विचारले कि काय तिला याबद्दल काही माहिती आहे काय? यावर मलायका म्हणाली कि ती त्यालोकांच्या पैकी नाही, जे कोणाच्याही जीवनात हस्तक्षेप करेल आणि ना कि ती तिच्या मुलाला त्याच्या वडिलांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणताही प्रश्न विचारते. अनेक लोक असे करतात, परंतु मी हे करू शकत नाही. मला असे करण्यामध्ये कोणताही रस नाही.