मलायका अरोरा कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. हि अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल जीवनापेक्षा तिच्या फिटनेसमुळे आणि तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत येत असते. मलायका ने तिचा ओटीटी शो ‘मुविंग इन विथ मलायका’ मध्ये तिच्या जीवनाशी जोडलेल्या अनेक रंजक खुलासे केले आहेत. शो मध्ये या अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक जीवनातील प्रत्येक पैलूवर मनमोकळेपणाने बोलली आहे. अलीकडे या अभिनेत्रीने केलेला खुलासा सोशल मिडीयावर खूप वायरल होताना दिसत आहे.
मलायका अरोरा ने यंग इंडियन्स च्या सातव्या नेशनल समिट ‘टेक प्राईड २०२३’ मध्ये काही अशी टिप्पणी केली ज्यामुळे सोशल मिडीयावर युजर्स चे लक्ष तिच्या कडे जाताना दिसत आहे. या कार्यक्रमात मलायका अरोराने तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मोकळेपणाने बोलताना सर्व पतींना एक सल्ला दिला आहे.
इवेन्टमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करताना मलायकाने ‘पार्टनर’ चे कौतुक केले आहे तसेच हावभाव करताकरता फैशन आइकॉन ने तिच्या बॉयफ्रेंड चे कौतुक देखील केले आहे. मलायका ने सांगितले कि ती तिच्या जीवनात योग्य व्यक्तीला खूप महत्व देते आणि तिला एक खूप चांगली व्यक्ती भेटली आहे.
पत्नीला पूर्ण आदर द्या – मलायका ने या कार्यक्रमामध्ये हजर असलेल्या सर्व नवऱ्यांना एक अशी गोष्ट सांगितली जी अलीकडे चर्चेचा विषय बनली आहे. ती सांगते कि, “मी इथे उपस्थित असलेल्या सर्व पुरुषांना सांगू इच्छिते कि जर तुमची पत्नी इथे तुमच्या सोबत असेल अथवा घरी तुमची वाट पाहात असेल तर तुम्ही तिच्या जवळ जावा, तिला पूर्ण आदर द्या कारण तुमच्या पत्नीचे तिच्या जीवनात खूप महत्व आहे.
जर तुमची पत्नी खुश असेल तर तुमच्या जीवनाला आणखीन चांगले बनवण्यास मदत करते. मलायका ने भलेही अरबाज खान सोबत घटस्फोट घेतला आहे परंतु ते दोघेही त्यांचा मुलगा अरहान मुळे अजूनही एकमेकांच्या सोबत जोडले गेले आहेत. मलायका आणि अरबाज यांना अनेक वेळा एकमेकांच्या सोबत पाहिले गेले आहे.