HomeBollywood“व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींसोबतच...” ९० च्या दशकामधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

“व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींसोबतच…” ९० च्या दशकामधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा…

बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी आज फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे. तिने शाहरुख खानच्या परदेस चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. डेब्यू चित्रपटामधून महिमा लोकप्रिय झाली होती. तथापि त्यानंतर तिचे करियर इतके खास राहिले नाही. राजकारणामध्ये आणि बॉलीवूडच्या बाहेर अनेक वेळी ती आपल्या वक्तव्यामुळे चर्चेमध्ये राहिली आहे.

सध्या महिला चौधरी एका मुलाखतीमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे. मुलाखतीदरम्यान तिने बॉलीवूडमधील काळे सत्य जगासमोर आणले आहे. बॉलीवूडमध्ये फिमेल कलाकारांप्रती होत असलेल्या बदलावर तिने आपले मत व्यक्त केले आहे. यासोबत तिने आधीच्या काळामध्ये अभिनेत्रींसोबत झालेल्या असमानतेवरही गंभीर आरोप केले आहेत.

ती म्हणते कि मला वाटते इंडस्ट्री आता त्या लेवलला जात आहे जिथे फिमेल कलाकारांना देखील चांगल्या संधी मिळत आहेत. त्यांना चांगले पार्ट्स, पेमेंट, एंडोर्समेंट मिळत आहेत आणि ते आता खूप पावरफुल पोजीशनमध्ये आहेत. त्यांच्याजवळ आधीपेक्षा जास्त चांगले आयुष्य आहे.

त्यांनी सध्याच्या काळामध्ये इंडस्ट्रीमध्ये झालेल्या बदलावर म्हंटले कि आज लोक फिमेल कलाकारांना वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वीकार करत आहेत. तिने बातचीत दरम्यान सांगितले कि त्यांच्या काळामध्ये आपल्या पर्सनल आयुष्याला करियरमुळे लपवावे लागत होते.

ज्यावेळी तुम्ही कोणाला डेट करत आहात, लोक आपल्या चित्रपटामधून बाहेर ठेवतात कारण त्यांना फक्त व्हर्जिन मुलीच हव्या होत्या ज्यांना कधी कोणी कीस देखील केलेले नव्हते. यामुळे जर तुम्ही कोणाला डेट करता असाल तर ते म्हणतील कि अरे! ती डेट करत आहे. जर तुमचे लग्न झाले असेल तर विसरून जा, तुमचे करियर उद्ध्वस्त झाले.

ती म्हणते कि त्यावेळी लग्न किंवा करियर यामधील एकच गोष्ट करू शकत होता. आज तुम्ही दोन्हीसोबत करियर सुरु ठेऊ शकता. सध्या लोक महिलांना प्रत्येक भूमिकेमध्ये स्वीकारत आहेत. इतकेच नाही तर आई किंवा पत्नी बनल्यानंतर देखील रोमँटिक भूमिका स्वीकार केल्या जात आहेत. त्यांच्या पर्सनल लाईफला सेलिब्रेट केले जात आहे.

महिमाने फक्त फिमेल कलाकारच नाही तर मेल कलाकारांच्या देखील समस्यांचा उल्लेख केला. अनेक पुरुषांना देखील आपल्या पर्सनल लाईफला लपवावे लागत होते. त्यांचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर किंवा अनेक वर्षांनंतर आपल्याला माहित व्हायचे कि त्याचे लग्न झाले आहे. महिमा चौधरीने परदेस चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये आपले करियर सुरु केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

सुभाष घई द्वारा दिग्दर्शित या चित्रपटामध्ये माहिमला खूपच पसंद केले गेले होते. यानंतर ती दिल क्या करे, दाग द फायर, धड़कन, दीवाने, कुरुक्षेत्र, लज्जा, ये तेरा घर ये मेरा घर, दिल है तुम्हारा इत्यादी चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. अभिनेत्रीने २००६ मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले होते. २००७ मध्ये तिला मुलगी अरीयाना झाली. लग्नाच्या काही वर्षांनंतर २०१३ मध्ये महिमा आणि बॉबीचे घटस्फोट घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts