दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू सध्या खूपच कठीण काळातून जात आहे. त्याचे वडील कृष्णाचे १५ नोव्हेंबर रोजी कार्डियक अरेस्टमुळे निधन झाले होते. आता कृष्णाच्या निधनानंतर १० दिवसांनी महेश बाबूने सोशल मिडियाद्वारे एक पोस्ट शेयर करत त्यांची आठवण काढली आहे. यासोबत त्याने एक भावनिक नोट देखील लिहिली आहे.
महेश बाबूने पोस्टमध्ये लिहिले आहे कि, तुमची लाईफ सेलिब्रेट केली गेली, तुमचे न राहणे हे त्यापेक्षा देखील जास्त सेलिब्रेट केले गेल. तुम्ही खूपच महान आहात. तुम्ही तुमचे आयुष्य निर्भयपणे जगलात, तुमचे व्यक्तिमत्व डेयरिंग डॅशिंग होते. माझे इंस्पिरेशन, माझे करेज आणि ते सर्व जे मी तुमच्याकडे पाहत आलो आणि ते सर्व लोक जे माझ्यासाठी महत्व ठेवत गेले.
महेश बाबूने पुढे लिहिले आहे कि, पण मला याचे आश्चर्य वाटतं आहे कि यावेळी मला एक अशी ताकद जाणवत आहे जी मला याआधी कधीच जाणवली नाही. आता मी निर्भय झालो आहे. तुमचा प्रकाश मला नेहमीच चमकवत नाही. मी तुमचा वारसा पुढे नेईन. माझ्या तुम्हाला आणखी अभिमान वाटेल. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, माझा सुपरस्टार.
कृष्णा यांचा जन्म ३१ मी १९४२ रोजी आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यामध्ये बुरिपलेम येथे झाला होता. त्यांनी आपल्या करियरमध्ये ३५० चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या काळामधील ते टॉप अभिनेत्यांपैकी एक होते. अभिनेत्री, प्रोड्यूसर, डायरेक्टर असण्यासोबत ते पॉलिटिशियन देखील होते. २००९ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्म भूषणने सन्मानित केले होते. माहितीनुसस्र कृष्णा आपल्या पत्नीच्या निधनानंतर डिप्रेशनमध्ये होते.
महेश बाबूने काही दिवसांपूर्वी आपल्या दिवंगत वडिलांसाठी प्रेयर मीट ठेवले होते ज्यामध्ये फॅमिली आणि फ्रेंड्स शिवाय इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. यादरम्यान महेश बाबूने आपल्या वडिलांच्या आठवणीत त्यांना श्रद्धांजलि अर्पित केली होती. त्याच्यासोबत त्याची पत्नी नम्रता शिरोडकर देखील होती.
दोन महिन्यांपूर्वी महेश बाबूने त्याच्या आईला गमावले होते. आता वडिलांच्या निधनानंतर महेश बाबू पूर्णपणे खचला आहे. महेश बाबूचे वडील प्रसिद्ध तेलगु अभिनेता होते. त्यांना तीन मुली, महेश बाबू आणि मोठा मुलगा रमेश बाबू होता. रमेश बाबूचे देखील याच वर्षी जानेवारीमध्ये यकृताच्या दीर्घ आजाराने निधन झाले होते.
View this post on Instagram