साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार महेश बाबू एकाचा वर्षात भाऊ, आई आणि वडिलांना गमावल्यामुले खूपच खचला आहे. त्याचे वडील आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता घट्टामनेनी शिव राम कृष्ण मूर्ति उर्फ़ कृष्णा यांचे १५ दिवसांपूर्वी १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. परंपरेला अनुसरून महेश बाबूने वडिलांचा विधिवत अंत्यसंस्कार केला. पण या दरम्यान आपले मुंडण न केल्यामुळे तो इंटरनेट यूजर्सच्या निशाण्यावर आला होता. तथापि याचे खरे कारण आता समोर आले आहे जे खूपच चकित करणारे आहे.
वास्तविक हिंदू संस्कृतिनुसार जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्याला विशेषत: आई किंवा वडिलांना अग्नी देते, तेव्हा तो प्रथम आपले मुंडण करतो. मात्र महेश बाबूने तसे न करता वडिलांना अग्नी दिला. तेव्हापासून हा प्रश्न उपस्थित होत आहे कि महेश बाबूने असे का केले ? एका तेलगु वेबसाईट नुसार असा दावा केला जात आहे कि सुपरस्टारने त्याच्या चित्रपटांच्या कमिटमेंटमुळे असे केले. असे म्हंटले जात आहे कि जर महेश बाबूने आपले मुंडण केले असेत तर त्याच्या भूमिकांनुसार त्याचे केस पुन्हा वाढण्यास ६ महिने लागले असते, यामुळे त्याने मुंडण न करण्याचा निर्णय घेतला.
सुपरस्टार कृष्णा गुरु यांचे निधन ७९ व्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. पाच दशके मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असलेल्या कृष्णा यांनी ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. भारत सरकारने कला क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण देऊन सन्मानित केले होते.
महेश बाबू त्याच्या वडिलांना आपले प्रेरणास्रोत मानत होता आणि तो त्यांच्या खूप जवळ होता. बालकलाकार म्हणून महेश बाबूने त्याच्या वडिलांसोबत निदा, अनन्ना थम्मुदु आणि गुडाचारी ११७ सारख्या जवळ जवळ २५ चित्रपटांमध्ये काम केले. महेश बाबू सध्या त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट्स त्रिविक्रम श्रीनिवासच्या दिग्दर्शित SSMB२८ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.
चित्रपटाच्या त्याच्यासोबत पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटानंतर तो एसएस राजामौली यांच्या पॅन इंडिया चित्रपटावर काम करण्यास सुरुवात करणार आहे ज्याचे नाव अद्याप ठरलेले नाही. माहितीनुसार हा चित्रपट २०२३ मध्ये येऊ शकतो.