अभिनेता नरेश बाबू आणि कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश आपल्या कामा व्यतिरिक्त काही वेगळ्या कारणाने चर्चेत येत आहेत. दोघे मागील काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत, अशा बातम्या सारख्या मिडिया च्या समोर येताना दिसत आहेत, तसेच आता नरेश बाबू ने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंट वरून एक विडीओ शेअर केला आहे ज्यामुळे चाहते चकित झाले आहेत. या विडीओ मध्ये ते त्यांच्या लग्नाची बातमी सांगताना दिसत आहेत.
जोडीने सोशल मिडिया वर एक विडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या आयुष्याची झलक दाखवण्याचा दावा केला आहे. विडीओ मध्ये नरेश आणि पवित्रा यांना एक केक कापताना, एकमेकांना चारताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना पाहिले जाऊ शकते.
त्यांच्या मागे आतषबाजीने आकाश उजळून निघाले आहे. विडीओ च्या शेवटी ‘लवकरच लग्न होणार आहे…पवित्रानरेश ‘लिहिले आहे, विडीओ ला शेअर करताना नरेश ने लिहिले आहे कि, नवीन वर्ष. नवीन सुरुवात. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद पाहिजे. तुम्हा सर्वाना आमच्याकडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी पवित्रानरेश’.
नरेश च्या या विडीओ ने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. लोक कमेंट करून अभिनेत्याला प्रश्न विचारात आहेत कि तुम्ही दोघे खरोखर लग्न करणार आहेत का येणाऱ्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहात. काही काळ आधी अफवा देखील आली होती कि हि जोडी एका मालिकेमध्ये एकत्र काम करणार आहे ज्याची माहिती अजून येणे बाकी आहे. या कलाकारांच्या माहितीकारांनी देखील यांच्या लग्नाच्या बातमीवर मौन बाळगले आहे.
नरेश बाबू ने त्याच्या वैयक्तिक कारणामुळे त्याच्या आधीच्या तिन्ही पत्नींसोबत संबंध तोडले आहेत आणि सध्या तो एकटाच रहात आहे. पवित्रा बद्दल बोलाल तर तिचा पहिला पती सुचेंद्र प्रसाद पासून ती वेगळी झाली आहे, परंतु कायदेशीर रित्या नाही. आता नरेश सोबत लग्न करण्यासाठी तिने अजून पती ला घटस्फोट दिला आहे कि नाही याची अजून माहिती आलेली नाही. असो आता पुढे पाहावे लागेल कि नरेश द्वारे शेअर करण्यात आलेला विडीओ वास्तवात आहे.
New Year ✨
New Beginnings 💖
Need all your blessings 🙏From us to all of you #HappyNewYear ❤️
– Mee #PavitraNaresh pic.twitter.com/JiEbWY4qTQ
— H.E Dr Naresh VK actor (@ItsActorNaresh) December 31, 2022