HomeCricketएमएस धोनीने बनवले ५ स्टार सारखे फार्महाऊस, मुव्ही हॉल पासून ते स्विमिंग...

एमएस धोनीने बनवले ५ स्टार सारखे फार्महाऊस, मुव्ही हॉल पासून ते स्विमिंग पूल आहेत सर्व सुविधा, पहा फोटोज…

भारतीय संघाचा पूर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी ला कैप्टन कुल नावाने देखील ओळखले जाते. धोनीचा स्मार्टनेस आणि लाजाळूपणा जगाला खूप आवडतो. त्याने १५ ऑगस्ट २०२० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट चा निरोप घेतला होता परंतु तो प्रत्येक वर्षी आईपीएल मध्ये खेळताना दिसतो. मात्र आज आम्ही तुम्हाला त्याच्या क्रिकेट करिअर बद्दल नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी ओळख करून देणार आहे.

महेंद्र सिंह धोनी ने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतला आहे, मात्र अजूनही तो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट खेळाडूंच्या यादीत सामील आहे. धोनी जवळ एका पेक्षा एक महागड्या गाड्या आहेत.

झारखंड ची राजधानी असलेल्या रांची मध्ये त्याचा खूप अलिशान फार्महाऊस आहे. माही आणि त्याचे कुटुंब याच फार्महाऊस मध्ये राहतात.

धोनी ची पत्नी साक्षी सोशल मिडीयावर खूप एक्टीव असते आणि ती त्यांच्या फार्महाऊसचे फोटो चाहत्यांच्या सोबत शेअर करत असते. धोनीचा हा फार्महाऊस ७ एकर मध्ये पसरलेला आहे, ज्यामध्ये जिम, स्विमिंग पूल आणि बाग देखील आहे.

धोनी च्या फार्महाऊस मध्ये कौटुंबिक मित्र आणि सहकारी क्रिकेटर्स साठी एक समर्पित हैगआउट स्पॉट देखील आहे. या जागेचा वापर धोनी आणि त्याची पत्नी कायम पार्टी आणि मेजवानीसाठी करत असतात.

कर्णधार म्हणून सर्व आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी हा पहिला खेळाडू होता. त्याने २००७ मध्ये T२० विश्वचषक जिंकला होता आणि त्यानंतर २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. दोन वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही त्याने भारतीय संघाच्या नावावर केले होते.

धोनीने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०१९ मध्ये विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत खेळला होता. आपल्या क्रिकेट करियरमध्ये त्याने ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ४१ वर्षीय धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नईकडून खेळत आहे. तो चेन्नई सुपर किंग संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामात म्हणजेच २०२३ मध्ये देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. असे मानले जात आहे कि २०२३चे आयपीएल हंगाम त्याच्यासाठी शेवटचे असू शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts