आपल्या सर्वांना रेल्वेने प्रवास करणे आवडते, परंतु कधी तुम्ही भारतातील सर्वात महागड्या रेल्वे ने प्रवास करण्याचा विचार केला आहे. असो बजेटच्या दृष्टीने अवघड तर वाटते परंतु आज आम्ही तुम्हाला चित्रांच्या माध्यमातून या रेल्वे मधून प्रवास करून देणार आहोत. चला तर मग प्रवास सुरु करूया-
आम्ही सांगणार आहोत देशातील सर्वात महाग रेल्वे बद्दल, या रेल्वे मध्ये अशा सुखसुविधा आहेत ज्या तुम्हाला फाईव स्टार हॉटेल मध्ये देखील मिळणार नाहीत. रेल्वे मध्ये जाताच तुम्हाला असे वाटेल कि तुम्ही जगातील सर्वात छान हॉटेल मध्ये गेला आहात.
होय, इंडियन रेल्वे कैटरिंग एंड टुरीजम कॉर्पोरेशन द्वारे चालवली जाणारी महाराजा एक्स्प्रेस रेल्वे भारतातील सर्वात महागड्या रेल्वेंमध्ये गणली जाते. ही रेल्वे सात दिवस चार वेगवेगळ्या मार्गावर प्रवास करते ज्यामध्ये ‘द इंडियन पैनरोमा’, ‘ट्रेजर्स ऑफ इंडिया’, ‘द इंडियन स्प्लेंडर’ आणि ‘द हेरीटेज ऑफ इंडिया’ या मार्गांचा समावेश आहे.
रेल्वे च्या आतील दृश्ये पाहून तुमचे डोळे तृप्त होतील. तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. रेल्वेच्या आतील बसण्याची खोली असो अथवा बेडरूम सर्व काही राजेशाही दिसत आहे. या रेल्वेमध्ये तुम्हाला सर्वकाही राजेशाही व्यवस्था करण्यात येते.
या रेल्वे मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रवास आणि केबिन च्या हिशोबाने भाडे आकारले जाते. द इंडियन पैनरोमा पैकेज च्या डिलक्स रूम ची किंमत जवळपास ११ लाख पासून सुरु होतेतर याच प्रवासातील प्रेसिडेंटीअल सुट ची किंमत जवळपास ४० लाख रुपये आहे. तुम्ही यावरून अंदाज लावू शकता कि या रेल्वेचा प्रवास किती महाग आहे.