सोशल मिडियावर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील ज्यामध्ये लोक जादू करून दाखवत असतात. काही लोक याला हाताची सफाई म्हणतात तर काही लोक याला आर्ट म्हणतात. तथापि याबद्दल अनेक दावे देखील केले जातात. सध्या सोशल मिडियावर जादूबद्दल जास्तच चर्चा होऊ लागली आहे. यादरम्यान असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये एका जादुगाराचे पितळ उघडे पडले आहे. एका मुलाने त्याच्या जादूची पोलखोल केली.
वास्तविक हा व्हिडीओ एका युजरने ट्विटरवर नुकताच शेयर केला आहे. यामध्ये कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि हा जाडी मोडली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे कि एक जादुगार लोकांनाजमवून जादू दाखवत आहे आणि त्याच्यासोबत एक बेड सारखी एक गोष्ट दिसत आहे. त्याने एका मुलीला असे सेट केले आहे जसे तिला कंबरेपासून कापणार आहे.
यानंतर पुढच्या क्षणी त्या मुलीचे फक्त पायच दिसू लागतात तर त्याच्या वरचा भाग गायब होतो. असा नजारा पाहून तिथले लोक रोमांचित होतात. जादूगर टेबल इकडे तिकडे फिरवू लागतो, जेणेकरून लोकांना विश्वास बसावा कि मुलीचे पाय खरे आहेत आणि ती जिवंत आहे. लोक हि जादू पाहू हैराण देखील झाले पण नंतर असे काही झाले कि जादूगर तोंडावर पडला.
पब्लिकमधून एक मुलगा उठतो आणि तो टेबल खोलतो आणि मुलीचा वरचा भाग टेबलच्या गादीमध्ये लपवलेला बाहेर काढतो. यामध्ये स्पष्ट दिसत आहे कि तो जादूगर लोकांना मूर्ख बनवत होता आणि आपली जादू दाखवण्यासाठी त्याने मुलीला कंबरे पासून कापले होते. याचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा लोक त्याला ट्रोल करू लागले.
the magic is broken pic.twitter.com/YK2pr8AQyX
— Great Videos (@Enezator) March 6, 2023