HomeBollywoodमाधुरी दीक्षितने शेयर केले तिचे कौटुंबिक फोटो आणि सांगितले लग्नानंतर अमेरिकेतील तिचे...

माधुरी दीक्षितने शेयर केले तिचे कौटुंबिक फोटो आणि सांगितले लग्नानंतर अमेरिकेतील तिचे आयुष्य कसे होते…

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मिडियाद्वारे नेहमी चाहत्यांसोबत कनेक्ट राहते आणि आपल्या पर्सनल लाईफची झलक चाहत्यांसोबत शेयर करते. बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मुलगा अरिन ग्रॅज्युएट झाला आहे. तिने या प्रसंगी काही कौटुंबिक फोटो शेयर केले आहेत आणि एक प्राउड मूमेंट नोट देखील लिहिली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित जेव्हा लग्नाच्या अगोदर इंडियामध्ये होती तेव्हा तिची लाईफ नेहमी ग्लॅमरस दिसत नव्हती. तिच्याजवळ फेम नव्हता ना संपत्ती नव्हती. टॉप अभिनेत्री असूनदेखील तिने लग्न करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणारा होता.

माधुरी दीक्षितने करियरच्या पिकवर असताना अचानक लग्न करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे तिचे चाहते खूप हैराण झाले होते. त्यापेक्षा देखील हैराणीची गोष्ट हि होती कि तिने एखाद्या अभिनेत्यासोबत किंवा इंडस्ट्रीसंबंधी व्यक्तीला आपला जोडीदार निवडला नाही तर अशा व्यक्तीसोबत लग्न केले ज्याला तिच्या कुटुंबियांनी निवडले होते.

१९९९ मध्ये धक-धक गर्लने आपल्या चाहत्यांचे हृदय तोडत डॉक्टर श्रीराम नेने सोबत लग्न केले. यानंतर ती इंडियामध्ये न राहता अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झाली जिथे तिचे पती राहत होते. लग्नानंतर माधुरीने वर्क प्रॉजेक्ट हातावर मोजण्याइतकेच केले आणि अनेक वर्षांनंतर ती भारतामध्ये परतली. यावेळी तिचे पती आणि मुले देखील भारतामध्ये आले. यानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा फिल्मी जगतामध्ये सक्रीय होण्यास सुरुवात केली.

माधुरी दीक्षितने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि लग्नानंतर अमेरिकेमध्ये गेल्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. तिने त्या गोष्टींचा अनुभव केला जो तिने याआधी कदीच एक्सपीरियंस नाही केला होता. अभिनेत्रीने जे सांगितले त्यामुळे इतर विवाहित महिला देखील निश्चित रिलेट करत असतील.

मुलाखतीमध्ये माधुरी दीक्षित नेणेने आपला अमेरिकेमध्ये राहण्यापुर्वीचा अनुभव शेयर केला. तिने सांगितले कि लग्न करून दुसऱ्या देशामध्ये गेल्याने तिचे लाईफ पूर्णपणे बद्द्ल्ले. ती म्हणाली कि मी खूपच सुरक्षित वातावरणात वाढले आहे. माझे आई-वडील नेहमी माझ्यासोबत होते. अगदी शूटिंग दरम्यान सुद्धा.

तथापि माझे जेव्हा लग्न झाले तेव्हा मी स्वतःसाठी निर्णय घेण्यास सुरुवात केली. अमेरिकेमध्ये वास्तव्यादरम्यान मी लाईफसंबंधी अनेक गोष्टी शिकल्या. जेव्हा भारतामध्ये होते तेव्हा माझ्या आसपास २० लोक नेहमी राहायचे, जो माझ्याबद्दल नेहमी चिंतिती राहायचे. तथापि अमेरिकेमध्ये मी पूर्णपणे आत्मनिर्भर राहायचे.

अभिनेत्रीने पुढे सांगितले कि कसे तिला अमेरिकेमध्ये सर्व गोष्टी स्वतः कराव्या लागायच्या. मुलांच्या संगोपनापासून ते प्रत्येक काम मला स्वतःला करावे लागत होते. मला जेव्हा मदतीची गरज असायची तेव्हा माझी आई आणि सासू मदतीला यायची. तुम्ही जासी मोठे होता तसे तुम्ही समजूतदार होत जाता आणि आपल्या अनुभवांपासून बरेच काही शिकता.

आज मी तेच अनुभव आपल्या लाईफसाठी वापरते. माधुरी दीक्षित आपली मुले रियान आणि आरिनसोबत नेहमी अनेक फोटो शेयर करत असते. माधुरी आपल्या दोन्ही मुलांना अभ्यासेतर कामांमध्ये देखील व्यस्त ठेवते. माधुरी दिस्खीतने श्रीराम माधव नेनेसोबत १९९९ मध्ये लग्न केले होते. आज दोघांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा लवकरच १८ वर्षाचा होईल आणि तिचा छोटा मुलगा १६ वर्षाचा झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts