लोक मोठ्या संख्येने एलआयसीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एलआयसीच्या गुंतवणूक योजना इतर योजनांपेक्षा सुरक्षित आणि अधिक विश्वासार्ह पर्याय आहेत. एलआयसीने सर्व वयोगटातील लोकांना लक्षात घेऊन विविध योजना सुरु केल्या आहेत. आज आपण एलआयसीच्या एका खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत.
एलआईसीच्या या योजनेचे नाव एलआईसी जीवन लाभ योजना आहे. एलआईसीच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर सेफ्टी आणि सेविंग दोन्हींचा लाभ मिळतो. या स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी एकरकमी रक्कम मिळते. एलआईसी जीवन लाभ योजना एक नॉन लिंक्ड योजना आहे. हि योजन स्टॉक मार्केटवर अवलंबून असते.
जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी जीवन लाभ योजना खरेदी केली तर तुम्ही मॅच्युरिटीच्या वेळी ५४ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोळा करू शकता. जर तुम्हाला ५४ लाख रुपये फंड गोळा करायचा असेल तर अशामध्ये तुम्हाला २५ वर्षाच्या कालावधीचा प्लान खरेदी करावा लागेल.
या योजनेमध्ये तुम्हाला विम्यासाठी २० लाख रुपयांची रक्कम निवडावी लागेल. यामध्ये तुम्हाला दर्स्वर्शी ९२४०० रुपयांचा प्रीमियम भरायचा आहे. अशामध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला ७७०० आणि प्रती दिवस २५३ रुपयांची बाजच करता.
जेव्हा तुमची हि पॉलिसी मॅच्युर होईल तेव्हा तुम्हाला ५४.५० लाख रुपये मिळतील. एलआईसीच्या या पॉलिसीमध्ये किमान १८ वर्षे आणि कमाल ५९ वर्षे वय असणारे लोक गुंतवणूक करू शकतात. एलआईसीच्या या योजनेत अनेक लोक गुंतवणूक करत आहेत.