फिफा विश्वचषकात अर्जेन्टिना ने २०२२ मध्ये इतिहास रचला आहे. त्यांनी लिओनेल मेस्सी च्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ कालांतराने विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. मेस्सी ने जिंकल्यानंतर जवळपास आठवडाभरानंतर भारताचा पूर्व कप्तान महेंद्र सिंग धोनी ची मुलगी जीवा च्या साठी एक अद्भुत भेट पाठवली आहे. एक अशी भेट ज्याला मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात.
काही दिवसांपूर्वी एका पूर्व क्रिकेटर प्रज्ञान ओझा ने खुलासा केला होता कि मेस्सी ने बीसीसीआय चे अध्यक्ष जय शाह च्या साठी एक सही केलेली जर्सी पाठवली होती. आता हे देखील समोर आले आहे कि मेस्सी ने आणखी एक टी शर्ट धोनी ची मुलगी जीवा साठी पाठवला आहे. जीवा ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये मेस्सी ने पाठवलेली भेट जर्सी दिसत आहे.
मेस्सी चा चाहता वर्ग भारतामध्ये करोडोच्या घरात आहे. एमएस धोनी देखील फुटबॉल चा चाहता आहे. त्याने काही वर्षापूर्वी मेस्सी बद्दल एक ट्विट केले होते. तथापि, एमएस धोनी सोशल मिडिया पासून थोडा दूरच असतो. आता या भेट केलेल्या जर्सी बद्दल एमएस धोनी ने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
लिओनेल मेस्सी ने त्याच्या करिअर मध्ये एक देखील विश्वचषक ट्रॉफी जिंकलेली नाही. फिफा विश्वचषक २०२२ च्या शेवटच्या सामन्यामध्ये त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. ९० मिनिटांपर्यंत अर्जेन्टिना आणि फ्रांस दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत होते. वाढीव वेळेमध्ये सामना ३-३ अशा बरोबरीमध्ये होता. मेस्सी ने या सामन्यामध्ये एकूण २ गोल केले. मेस्सी ने विश्वचषक सामन्यामध्ये आता एकूण १२ गोल केले आहेत.
View this post on Instagram