रवींद्र संगीताच्या दिग्गज गायिका सुमित्रा सेन यांचे मंगळवारी कोलकाता येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. सुमित्रा सेन या ब्रोंको न्यूमोनिया ने त्रस्त होत्या आणि त्यांना २१ डिसेंबर ला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. तथापि तीन दिवसांनंतर त्यांना हॉस्पिटल मधून सोडण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही मुलींनी त्यांना दक्षिण कोलकाता मधील त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या.
त्यांची मुलगी श्रावणी सेन ने एका फेसबुक पोस्ट द्वारे सांगितले कि, आई आज सकाळी आम्हाला सोडून गेली. सुमित्रा सेन यांच्या दोन्ही मुली श्रावणी आणि इंद्राणी देखील रवींद्र संगीताच्या प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले कि सुमित्रा सेन यांना डिसेंबर च्या मध्यापासून थंडी लागून आली होती आणि वयामुळे त्यांची तब्बेत खूपच गंभीर झाली होती.
श्रावणी सेन यांनी सांगितले कि त्यांच्या आई चे वय जास्त आहे आणि त्या वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी सांगितले होते कि त्यांच्या आई ची तब्बेत ठीक नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी आई ला घरी आणले होते. मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी सुमित्रा सेन यांच्या निधनावर दुखः व्यक्त केले आहे.
त्या म्हणाल्या, सुमित्रा सेन यांच्या आकस्मिक निधनाने मला खूप दुखः झाले आहे, ज्यांनी अनेक दशके प्रेक्षकांना भुरळ घातली. माझे त्यांच्या सोबत खूप जवळचे संबंध होते. पश्चिम बंगाल सरकार ने त्यांना २०१२ मध्ये संगीत महासम्मान पुरस्कार दिला होता. मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. सुमित्रा दीदींच्या मुली इंद्राणी आणि श्रावणी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी माझ्या संवेदना आहेत.
सुमित्रा सेन ने मेघ बोलेछे जावो जावो, तोमारी झारनतालार निर्जन, सखी भबोना कहारे बोले, अच्छे दुखो अच्छे मृत्यू सारख्ये शेकडो गाणी गायली आहेत. या गाण्यांनी चार दशकांपेक्षा जास्त रवींद्र संगीत च्या प्रेमींचे मनोरंजन केले आहे.