HomeBollywoodसुंदर दिसण्यासाठी ४३ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीने चेहऱ्यावर घेतले इंजेक्शन, आता अशी झाली...

सुंदर दिसण्यासाठी ४३ वर्षाच्या ‘या’ अभिनेत्रीने चेहऱ्यावर घेतले इंजेक्शन, आता अशी झाली आहे अवस्था कि ओळखणे देखील झाले कठीण…

टीव्हि इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री पैकी एक लता सभरवाल प्रसिद्ध मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये हीना खान ची पडद्यावरील आई ची भूमिका करण्यावरून ओळखतात. त्यांनी काही अन्य टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहेत. सोबतच ‘विवाह’ आणि ‘इश्क विश्क’ सारख्या पिक्चर मध्ये पाहायला मिळाले. काही दिवसांपासून त्या टीव्ही पासून लांब आहेत, परंतु सोशल मिडीयावर त्या स्कीन आणि हेल्थ संबंधित ब्लॉग शेअर करत असतात. दरम्यान अलीकडेच, अभिनेत्रीने खुलासा केला आहे की, त्यांनी ४३ वा ४४ वयाची असताना चेहऱ्याची सर्जरी केली होती.

लता सभरवाल यांनी आपल्या युट्युब चैनल वर एक ब्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आपली बोटोक्स स्टोरी शेअर केली आहे. त्यांनी सांगितले की, “मी जेंव्हा ४३ वा ४४ वयाची झाले तेंव्हा माझ्या डोळ्यांच्या खाली खूप रेश्या येत होत्या. बाकी काही नव्हते. पौष्टिक खाने आणि व्यायाम करते तोपर्यंत सर्व ठीक होते, फक्त डोळ्यांच्या खाली रेश्या आलेल्या होत्या. जेंव्हा पण मी तयार होत असताना मला ते पाहून खूप वेगळे वाटत असे. मला वाटले की वयाच्या मानाने असे होत असेल तर मला त्याचा स्वीकार करावा लागेल.”

लता यांनी सांगितले की, त्या आपल्या डोळ्यांच्या खालील रेश्यानी त्रासल्या होत्या, तेंव्हा त्यांना सर्जरी ची कल्पना सुचली, त्यांनी सांगितले की, “मी माझ्या सर्वात जवळच्या मैत्रिणीसोबत चर्चा केली की, दुसर्या अभिनेत्री आपल्या चेहऱ्यावर काही ना काही करत असतात. मला त्यांच्या बोलण्यावरून संतुष्टी मिळाली नाही म्हणून मी माझ्या डॉक्टर ला भेटायला गेले.

तर त्यांनी मला खूप आग्रह केला की, सर्व जन करतात आणि हे खूपच सामान्य आहे. मी त्यावेळी घरी आले आणि माझ्या डोक्यात फक्त तेच विचार चालू होते. मी जेव्हा परत त्यांच्या कडे गेले तेंव्हा त्यांनी मला सांगितले की, बोटोक्स केल्याने तुम्हाला नशा होते. तुम्हाला ते सारखे सारखे करावेसे वाटते. तथापि त्याचा परिणाम फक्त ६ महिन्या पर्यंत रहातो.”

लता यांनी पुढे सांगितले की, “मी खूपच अस्वस्थ झाले होते, कारण की मी शोबिझ मध्ये काम करत होते आणि अशात सुंदर दिसणे खूप महत्वाचे असते. त्यांनी माझ्या डोळ्यांच्या जवळ एक एक इंजेक्शन दिले. बोटोक्स केल्या नंतर मला माझी स्कीन खूपच चांगली वाटत होती, परंतु हळू हळू तेच मला त्रासदायक वाटू लागले, जेवढे मला माझ्या रेष्यानी त्रासदायक वाटत नव्हते,एवढे मी हे कृत्रिमरीत्या करून दुखी होते. मला हे दबावाखाली वाटत होते. मला बरे वाटत नव्हते, नंतर मला असे जाणवले की, मी जशी आहे तसेच स्वीकारायला हवे होते.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts