प्रसिद्ध अमेरिकी सेलिब्रिटी आणि रियालिटी स्टार लेले केंट ने स्पर्म डोनर च्या मदतीने मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे तिचा आधीचा पती एम्मेट सोबत वेगळे झाल्यानंतर तिने या निर्णयाची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे. वेंडरपंप रुल्स स्टार ने पोडकास्ट स्केनैनिगन्स ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ती इन विट्रो फर्टीलायजेशन च्याव्यातिरिक्त अंतर्गर्भाशयी गर्भाधान चा स्विकार करून पुढील वर्षी एक बाळाला जगात आणू शकते.
३२ वर्षाची सुपरस्टार आधी एका बाळाची आई आहे. तरी देखील तिने तिच्या पती सोबत केलेल्या गेलेल्या कौटुंबिक नियोजनाला लपवले नाही. यावेळी देखील तिने कोनासोबतही काहीही न लपवता या गोष्टीचे आव्हान केले आहे की आता ती कोणत्याही पुरुषा शिवाय स्पर्म डोनर च्या मदतीने एका बाळाला जन्म देणार आहे.
एका बाळाची आई आणि प्रसिद्ध टीवी अभिनेत्री केंट ने पुढील वर्षी या मुलाच्या तयारीसाठी आता पासूनच स्पर्म डोनर ला शोधण्यास सुरुवात केली आहे. केंट ने सांगितले की माझा पती अविश्वासू निघाला त्यामुळे मी पुन्हा कोणत्याही पुरुषा सोबत धोका पत्करू शकत नाही. माझी एक मुलगी आहे, जिला मी खूप प्रेम देते पण नवीन बाळ तर स्पर्म डोनर च्या मदतीने येणार.
साल्ट लेक सिटी मधील मूळ निवासी लेले केंट चे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत. तिने एका मुलाखतीच्या नंतर तिच्या पोस्ट ला नेटीजन्स आणखी समर्थन देत आहेत. केंट म्हणाली की माझ्या जीवनात या आधी जे काही घडले आहे त्यामुळे मी खूप घाबरले आहे. त्यामुळे मी सध्यातरी नव्या प्रेमी सोबत नातेसंबंधात अडकू शकत नाही.
लेले ने येणाऱ्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाळाच्या जन्माची इच्छा वर्तवली आहे. तिने ५१ वर्षाच्या चित्रपट निर्मात्यासोबत लग्न केले होते परंतु काही काळा नंतर वादावादी नंतर त्यांचे नातेसंबंध तुटले होते. लेले टीवी मालिका व्यतिरिक्त मॉडेलिंग देखील करते. ती काही मोठे ब्रांड देखील हाताळते. लेले चे चाहते तिच्या प्रत्येक पोस्ट ला वायरल करतात. तिच्या बद्दल असे देखील बोलले जाते की बिना कोणाच्या आधाराशिवाय आपल्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजनाच्या जगात आपले स्थान निर्माण केले आहे.