लाल इश्क, लाडो आणि उडान सारख्या लोकप्रिय शोचा भाग राहिलेली विन्नी अरोरा काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. ३१ वर्षाच्या अभिनेत्रीने गेल्या वर्षी तिच्या मुलाला जन्म दिला होता. सध्या ती तिचा पती आणि अभिनेता धीरज धूपर आणि मुलगा जैन धूपरसोबत गोवामध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. नुकतेच अभिनेत्रीने आपले बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेयर केला आहे.
सोशल मिडियावर सक्रीय राहणारी अभिनेत्री विन्नी अरोराने २३ मार्च २०२३ रोजी एपला एक कोलाज फोटो शेयर केला आहे. फोटोमध्ये ती पिंक कलरच्या बिकिनीमध्ये पाहायला मिळत आहे. तिने डिलिवरीपूर्वीचा आणि नंतरचा एक कोलाज फोटो शेयर केला. एकीकडे बिकिनी घालून ती आपले बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे तर दुसरीकडे ती तिचा मुलगा जैनला कडेवर घेतलेली दिसत आहे.
विन्नीने फोटो कोलाज शेयर करून कॅप्शनमध्ये लिहिले की, “रात्र किती वेगाने बदलते.” कुंडली भाग्यचा जुना करण लूथरा उर्फ धीरज धूपरने २०१६ मध्ये विन्नीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या अगोदर कपलने एकमेकांना जवळ जवळ ७ वर्षे डेट केले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये धीरज आणि विन्नी पहिल्यांदा आईवडील बनले होते.
कुंडली भाग्यमध्ये ५ वर्षांपर्यंत करण लूथराच्या भूमिकेमध्ये काम केलेला धीरज शेरदिल शेरगिलमध्ये शेवटचा दिसला होता. तो झलक दिखला जामध्ये देखील दिसला होता. याशिवाय तो बहनें, कुछ तो लोग कहेंगे, ससुराल सिमर का सारखी शोजमध्ये देखील दिसला आहे. सध्या तो गोवामध्ये फॅमिली टाईम एंजॉय कर्तर आहे आणि चाहत्यांसोबत फोटोज देखील शेयर करत आहे.
View this post on Instagram