सेक्रेड गेम्स फेम कुब्रा सैत तिच्या तिच्या बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत असते. यावेळी तिने बॉलीवूडचा दबंग खान सलमान खान वर नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडे दिलेल्या मुलखतीत तिने सलमान खान सोबत काम करण्याच्या तिच्या अनुभवावर बोलली. सलमान खान आणि कुब्रा सैत ने वर्ष २०११ मध्ये रेडी चित्रपटामध्ये काम केले होते. तिने सांगितले कि सलमान खान कायम शुटींग ला वेळाने येत असे. जिथे संपूर्ण टिम आणि क्रू सकाळी लवकर येत असत तो दुपारी २.४५ वाजता येत असे. संपूर्ण टिम त्याची वाट पहात बसली होती. चला तर जाणून घेऊया सलमान खान च्या वागण्याबद्दल कुब्रा सैत ने काय काय सांगितले.
कुब्रा सैत ने अलीकडे दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे कि चित्रीकरणासाठी सकाळी ५.३० वाजता हॉटेल मधून बाहेर पडत होते. फक्त एक सफरचंद घेऊन मी तिथे जात होते. मी त्यांना विचारत होते कि नाश्ता काय आहे. तर मला दुसरे सफरचंद देत होते. आधी सांगत होते कि आम्ही १० वाजता चित्रीकरणाला सुरुवात करतो नंतर ११… असे करत १२ देखील वाजत होते परंतु शुटींग सुरु होत नसे.
कुब्रा सैत ने सांगितले कि तिने अनेक तास वाट पाहिली आणि त्यानंतर दुपारी २.४५ वाजता सेटवर एकाच गोंधळ घातला. तुम्हाला माहित आहे सर्वात महत्वाची व्यक्ती आली आहे. प्रत्येकजण आपापली पायघोळ दुरुस्त करू लागला. नंतर समजले कि सलमान खान आला आहे. आम्ही एका गोल्फ कोर्स वर शुटींग करत होतो. तिथे मोठमोठ्या खिडक्या होत्या, तिथे सलमान खान येतो आणि पाठ टेकवतो, आपले डोके दोन्हीकडे मन फिरवतो आणि म्हणायचा ‘लंच ब्रेक करूया?’.
कुब्रा सैत हा प्रसंग हसत हसत आठवते. ती सांगते कि कसे ती फक्त एक सफरचंद खाऊन ती सकाळपासून शूट ची वाट पहात असे. ३ वाजेपर्यंत कोणतेही काम होत नसे. मी विचार करत असे कि काहीतरी काम तर करूया. परंतु नाही… आम्ही नंतर लंच केला.
कुब्रा सैत ने पुढे म्हणते कि, पण प्रत्येक गोष्टीची एक सकारात्मक बाजूही असते. सलमान खान एक असा अभिनेता आहे जो त्याच्या सर्व सहकलाकारांच्या सोबत मिळून मिसळून असतो. त्याचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. मला खूप चागले आठवते कि तो त्याच्या संपूर्ण सहकलाकारांच्या साठी एक मोठा जेवणाचा टेबल लावत असे. तो म्हणत असे कि सर्वांनी सोबत जेवायला पाहिजे. तर मला त्याची हि गोष्ट खूप चांगली वाटत असे.
View this post on Instagram