HomeBollywood‘क्रिती सेनन’चा व्यायाम करतानाचा व्हिडीओ व्हायरल, फिगर पाहून लोक म्हणाले; वरून खालीपर्यंत...

‘क्रिती सेनन’चा व्यायाम करतानाचा व्हिडीओ व्हायरल, फिगर पाहून लोक म्हणाले; वरून खालीपर्यंत सगळं…

अनेक सेलेब्रिटी हे फिटनेस फ्रिक असतात. दिवसदिवसभर जिममध्ये घाम गाळून ते आपला फिटनेस कसा चांगला ठेवता येईल याकडे जास्त लक्ष देत असतात. अनेक सेलेब्रिटी हे आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांसोबत सोशल मिडियावर शेयर करत असतात.

यादरम्यान आता अभिनेत्री क्रिती सेननने तिचा एक व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेयर केला आहे. व्हिडीओमध्ये ती ट्रेनरच्या मदतीने पाठीचा व्यायाम करताना दिसून येत आहे. व्हिडीओ शेयर केल्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही लोकांनी तिचे कौतुक केले आहे तर काही लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे. चवळीच्या शेंगेसारखी सडपातळ असलेल्या क्रिती फिटनेसच्या बाबतीत तितकीच जागरूक असल्याचे दिसून येते. व्यायामाचा तिला किती लाभ होतो हे देखील आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते.

क्रितीने व्हिडीओ शेयर केल्यानंतर अल्पावधीमध्ये तो प्रचंड व्हायरल झाला. तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक करताना यावर अनेक कमेंट केल्या आहेत. तर काही लोकांनी तिला ट्रोल करताना म्हंटले आहे कि वरून खालीपर्यंत सर्व काही सपाट दिसते.

अभिनेत्री क्रिती सेननच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन आठ वर्षे झाली आहेत. अल्पावधीमध्येच तिने बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमवले आहे. क्रिती सेननच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच आदिपुरुष चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये प्रभाससोबत अनेक दिग्गज कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्याचबरोबर गणपत, शहजादा आणि भेड़िया यासारखे तिचे चित्रपट देखील रिलीजसाठी तयार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts