अथिया शेट्टी-केएल राहुल आणि कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा नंतर आता कृति सेनन आणि प्रभास विवाह बंधनात अडकणार आहेत. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या एका माहितीनुसार हा दावा केला जात आहे कि या वर्षी कृति सेनन तिचा को-स्टार प्रभाससोबत एंगेजमेंट करणार आहे. आता या माहितीनुसार प्रभासच्या टीमने प्रतिक्रिया दिली आहे.
वातविक स्वयंघोषित चित्रपट समीक्षक उमैर संधूने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक ट्विट करत लिहिले होते कि कृति सेनन आणि प्रभास पुढच्या आठवड्यामध्ये मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत. हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर हि बातमी आगीसारखी पसरली.
तथ्पाई कृति सेननने या रुमर्स चे खंडन केले आहे. तिने आणि प्रभासच्या टीमने एंगेजमेंटच्या या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या टीमने एका मुलाखतीदरम्यान सांगितले कि प्रभास आणि कृति सेनन फक्त चांगले मित्र आहेत. त्यांच्या एंगेजमेंटच्या बातम्या खोट्या आहेत.
बॉलीवुड अभिनेत्री कृति सेनन आणि साऊथ अभिनेता प्रभासच्या डेटिंगच्या अफवा आदिपुरुष चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सुरु झाल्या आहेत. तथापि हि बातमी आगीसारखी तेव्हा पसरली जेव्हा सोशल मिडियावर या कपलचा एक फोटो समोर आला. हा फोटो आदिपुरुष चित्रपटाच्या टीजर लॉन्च दरम्यानचा होता. या फोटोमध्ये प्रभास आपली को-स्टार कृति सेननचा हात पकडलेला दिसत आहे. हा फोटो समोर येताच दोघांच्या डेटिंगची बातमी चर्चेचा विषय बनली.