बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन भेडिया चित्रपटापेक्षा आदिपुरुष को-स्टार प्रभासला डेट करत असल्याच्या बातम्यांवरून जास्त चर्चेमध्ये आहे. नुकतेच भेडिया अभिनेता वरुण धवनने क्रितीच्या लव्ह लाईफबद्दल वक्तव्य केले होते ज्यामुळे या बातम्यांना अधिकच हवा मिळाली.
मग काय क्रिती आणि प्रभासच्या लग्नाच्या बातम्या सध्या खूपच व्हायरल होत आहेत. आता फायनली क्रितीने यावर प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेयर केली आहे. जी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चला तर जाणून घेऊया त्या पोस्टमध्ये काय आहे.
क्रिती सेनॉनने इंस्टाग्राम स्टेटस वर फेक न्यूजकडे इशारा करत लिहिले आहे कि, हे प्रेम नाही किंवा पीआर नाही, रिअॅलिटी शोमध्ये आमचा भेडिया जरा जास्तच वाईल्ड झाला होता आणि त्याच्या विनोदामुळे सध्या हास्यास्पद अफवा पसरल्या आहेत. ३२ वर्षाच्या क्रिती सेनॉनने पुढे लिहिले कि काही पोर्टल माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्यापूर्वी, मला हा फुगा फोडू द्या. संपूर्ण अफवा नक्कीच निराधार आहे. यासोबतच अभिनेत्रीने हात जोडून एक इमोजीही तयार केला आहे.
वरुण धवन आणि क्रिती सेनॉन भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झलक दिखला जा शोमध्ये पोहोचले होते. जिथे वरुण धवनने म्हंटले होते कि क्रिती सेनॉनचे नाव कोणाच्या तरी हृदयामध्ये आहे आणि ती व्यक्ती मुंबईमध्ये राहत नाही. ती व्यक्ती सध्या दीपिका पादुकोणसोबत शुटींग करत आहे. हे ऐकल्यानंतर करण जौहर देखील शॉक्ड झाला होता. क्रिती सेनॉनने देखील यावर लाजून प्रतिक्रिया दिली होती. यानंतरच तिच्या आणि प्रभासच्या लग्नाची चर्चा सुरू झाली.
क्रिती सेनॉन आणि प्रभास आदिपुरुष चित्रपटामध्ये एकत्र पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. यामध्ये सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला होता तेव्हा याच्या VFX वरून खूपच ट्रोल करण्यात आले होते. यामुळे मेकर्सने यावर पुन्हा काम करण्याची प्लानिंग केली आहे.