भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जात असलेल्या कसोट सामन्याच्या पहिल्या दिवशी एक मजेदार घटना घडली. जेव्हा ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू होती, तेव्हा विराट कोहली आर अश्विनला हिंदी मध्ये समजावत होता. पण फलंदाजी करत असलेल्या उस्मान ख्वाजाला हिंदी चांगली समजते हे तो विसरला, हे लक्षात येताच एकच हश्या पिकला.
हि घटना २९ व्या षटका दरम्यान घडली. ऑस्ट्रेलियाच्या टीमने तेव्हा १०० धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या आणि उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेड खेळपट्टीवर उपस्थित होते. सलामीवीर उस्मान ख्वाजाने एक बाजू लावून धरली होती आणि तो ५१ धावांवर फलंदाजी करत होता.
दरम्यान अश्विनने एक चेंडू टाकला ज्याचा ख्वाजाने चांगला बचाव केला. यानंतर कोहली अश्विनला म्हणाला, अॅकश.. ये गेंद मार रहा था ये’. कोहली असे म्हणताच उस्मान ख्वाजाने त्याला स्माईल दिली आणि कोहलीला समजले की ख्वाजालाही हिंदी येते. यानंतर तो मोठ्याने हसला. वास्तविक, उस्मान ख्वाजा मूळचा पाकिस्तानचा आहे. त्याचे आई-वडील पाकिस्तानचे असून ते ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले आहेत. त्यामुळे उस्मान ख्वाजाला हिंदी चांगल्या प्रकारे येते आणि तो चांगली हिंदी बोलतो.
दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात १२५ चेंडूत ८१ धावा करून उस्मान ख्वाजा बाद झाला. ख्वाजा शिवाय पीटर हँड्सकॉम्ब (७२) ने देखील नाबाद अर्धशतक झळकावले. या दोन फलंदाजांच्या बळावर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात २६३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ४ आणि अश्विन आणि जडेजाने ३-३ बळी घेतले.
— Rahul Chauhan (@ImRahulCSK11) February 17, 2023