अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल कायमचे एकमेकांचे झाले आहेत. अथिया आणि केएल राहुल यांचे सोमवारी, २३ जानेवारी रोजी खंडाळ्यात सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर लग्न झाले. हे लग्न पूर्णपणे प्राईव्हेट ठेवले गेले होते. या रॉयल वेडिंगमध्ये बॉलीवूड आणि स्पोर्ट्स इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज उपस्थित होते.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. दोघे सुंदर पेस्टल पिंक आउट्फिटमध्ये पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नाचे कपडे डिझायनर अनामिका खन्ना यांनी तयार केले होते. माहितीनुसार अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्री पार्टी करण्याचा प्लॅन केला आहे. हे कुटुंब खंडाळा स्थित बंगल्यामध्ये आफ्टर पार्टी करणार आहे.
इथे लाउड म्यूजिक आणि डीजेसोबत डांस चालणार आहे. सर्व पाहुणे नवीन वधू-वरांसोबत हिट आणि ट्रेंडिंग संगीतावर नृत्य करतील. पापाराझीशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, त्याला केएल राहुलचे सासरे बनायचे नाही तर वडील व्हायचे आहे. अथिया आणि केएल राहुल यांच्या लग्नाचे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूड स्टार सुनील शेट्टी मीडियाला भेटण्यासाठी बाहेर आले होते. अभिनेत्याने यादरम्यान पेस्टल गुलाबी रंगाचे धोतर आणि कुर्ता परिधान केला होता. सुनीलसोबत त्याचा मुलगा अहान शेट्टीही दिसला. दोघांनी पापाराझींना मिठाई दिली आणि हात जोडून आभार मानले.
केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नात बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेरही पोहोचले होते. याशिवाय अथियाची फ्रेंड आणि स्टार किड्स कृष्णा श्रॉफ आणि अंशुला कपूर हे देखील लग्नात सहभागी झाले होते. कृष्णा ही जॅकी श्रॉफची मुलगी आहे आणि अंशुला ही बोनी कपूरची मुलगी आहे. अथिया आणि केएल राहुल यांनी इंटीमेट प्रकारे लग्न केले आहे. कपलच्या लग्नामध्ये दोघांचे जवळचे लोक आणि कुटुंबीय उपस्थित होते. अथिया आणि केएल राहुलच्या लग्नात सहभागी होण्यासाठी क्रिकेटर इशांत शर्मा पोहोचला होता.
View this post on Instagram
View this post on Instagram