भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर केएल राहुलला सध्या खराब फॉर्ममुळे टीकेला सामोरे जावे लागत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे, मात्र आता तो उपकर्णधार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीसह त्याच्या बॅटमधून केवळ ३८ धावा निघाल्या. दुसरीकडे त्याच्या निवडीमुळे सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या शुभमन गिलला बाकावर बसावे लागले आहे. अशा परिस्थितीत त्याच्या संघातील निवडीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदोरमध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. जो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यासाठी केएल राहुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये असावा हवा. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान केएल राहुल पत्नी अथिया शेट्टीसोबत महाकालच्या दर्शनासाठी पोहोचला आहे.
भारतीय क्रिकेटर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी २३ जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच महाकालाच्या दर्शनासाठी उज्जैनला आले आहे. माहितीनुसार दोघांनी जवळपास दोन तास मंदिरात वेळ घालवला आणि यादरम्यान दोघांनी भस्म आरतीमध्ये देखील भाग घेतला. केएल राहुलने आपल्या पत्नीसोबत गर्भगृहामध्ये जाऊन पूजा केली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना १ मार्चपासून इंदोरमध्ये खेळला जाणार आहे आणि त्यासाठीच केएल राहुल इंदोरमध्ये आला आहे. टीम इंडियाचे इतर खेळाडूही संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत वेगवेगळ्या फ्लाइटने इंदोरला पोहोचले आहेत. गेल्या १२ महिन्यांमध्ये केएल राहुलची कसोटीत सरासरी १३.६ आहे. तथापि त्याच्या खराब फॉर्मचा परिणाम टीम इंडियावर अद्याप झालेला नाही, कारण रोहितच्या नेतृत्वाखालील संघाने २०२३ साली विरोधी संघांविरुद्ध आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे.
KL Rahul and Athiya Shetty at the Mahakaleshwar Jyotirlinga Temple. pic.twitter.com/KQ1q04nuYg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 26, 2023