बॉलीवूडमधील सर्वात क्युट कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दोघे मिडियासमोर काहीही वक्तव्य करत नाही आहे आणि त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाच्या वेन्यु आणि गेस्ट लिस्टबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. आता गुड न्यूज हि आहे कि कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नाबद्दल पहिले कंफर्मेशन आले आहे.
बॉलीवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची आतुरता आता चाहत्यांना लागली आहे. लवकरच चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. कारण माहितीनुसार ६ फेब्रुवारी २०२३ रोजी कियारा आणि सिद्धार्थ विवाह बंधनात अडकणार आहेत.
सध्या याची बातमी सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. माहितीनुसार सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगढ हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. जैसलमेरचे हे सूर्यगड हॉटेल खूप प्रसिद्ध आहे. जे आपल्या सौंदर्यासोबतच राजेशाही शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे.
सूर्यगढ पॅलेस हा राजस्थानमधील जैसलमेर येथे डोंगरमाथ्यावर वसलेला आहे. जिथे तुम्हाला कोर्ट रूमपासून सिग्नेचर सूट आणि हेरिटेज रूम तसेच पॅव्हेलियन रूमपर्यंत सर्व सोयी उपलब्ध आहेत. या पॅलेसमधील एका खोलीचे भाडे जवळ जवळ २० हजार रुपये ते जवळ जवळ १ लाख १० हजार रुपयांपर्यंत आहे. इतकेच नाही तर जैसलमेरमध्ये स्थित या सूर्यगढ पॅलेस हॉटेलमध्ये दररोज ९० लाख प्रती दिवसानुसार लग्नाचे बुकिंग होते.
View this post on Instagram