HomeBollywoodकियारा अडवाणीच्या ब्राईडल एंट्रीचा व्हिडीओ आला समोर, पहा इतकी सुंदर दिसतेय कियारा...

कियारा अडवाणीच्या ब्राईडल एंट्रीचा व्हिडीओ आला समोर, पहा इतकी सुंदर दिसतेय कियारा अडवाणी…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी सध्या खूपच चर्चेमध्ये आहेत. नुकतेच दोघांनी ७ फेब्रुवारी रोजी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये विवाहबद्ध झाले. त्यानंतर दोघांनी रात्री उशिरा आपल्या लग्नाचे फोटो शेयर केले होते ज्यानंतर ते सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले.

सध्या नववधूच्या रूपातील कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. कियारा अडवाणीचा हा व्हिडीओ तिच्या लग्नातील एंट्रीचा आहे ज्यामध्ये ती खूपच खुश दिसत आहे. अभिनेत्री कियारा अडवाणी पिंक लेहेंगयामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री ब्राईडल एंट्रीच्या व्हिडीओमध्ये फुलाच्या चादर खालून चालत येताना दिसत आहे नंतर ती खुश होऊन शेरशाह चित्रपटामधील रांझा गाण्यावर नृत्य करताना देखील दिसत आहे. तर सिद्धार्थ तिची स्टेजवर वाट पाहताना पाहायला मिळत. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून चाहते त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करताना पाहायला मिळत आहेत.

याआधी कियारा आणि सिद्धार्थने लग्नाचे फोटो शेयर करताच ते चांगलेच व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नाचे फोटो आतापर्यंत सोशल मिडियावर सर्वात जास्त लाईक केले फोटो झाले आहेत. दरम्यान लग्नानंतर पहिल्यांदाच न्युली वेड कपल एयरपोर्टवर स्पॉट झाले.

यादरम्यान नववधू कियाराने भांगेमध्ये सिंदूर भरलेले पाहायला मिळाले, तिचा पिंक चुडा आणि मंगळसूत्र चर्चेचा विषय राहिले. प्रत्येकजण कियारा अडवाणीच्या मंगळसुत्राची क्लोज आणि क्लियर झलक पाहण्यासाठी आतुर आहे. सिद्धार्थ मल्होत्राने त्याची वधू कियाराच्या मंगळसुत्रासाठी चांगलीच रक्कम खर्च केली आहे. माहितीनुसार कियाराच्या मंगळसुत्राची किंमत २ करोड रुपये सांगितली जात आहे.

आता असा अंदाज लावला जात आहे कि कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिसेप्शन पार्टीनंतर दिल्लीहून आज मुंबईला राव होऊ शकतात, जिथे त्यांचे एक फुल स्टार रिसेप्शन होणार आहे. माहितीनुसार १२ फेब्रुवारी म्हणजेच या रविवारी हे ग्रँड रिसेप्शन होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts