HomeEntertainmentकेजीएफ फेम ‘या’ अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात केले दाखल, डॉक्टर म्हणाले; ‘कधीही...’

केजीएफ फेम ‘या’ अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक, रुग्णालयात केले दाखल, डॉक्टर म्हणाले; ‘कधीही…’

यश स्टारर आणि प्रशांत नील द्वारा दिग्दर्शित केजीएफ फेम अभिनेता कृष्णा जी राव ला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना बेंगळुरूच्या सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार अभिनेता एका नातेवाईकाच्या घरी जात होता आणि अचानक थकवा जाणवू लागल्यामुळे मध्यरात्री त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्याच्यावर इन्सेंटिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) उपचार सुरू आहेत. केजीएफ मध्ये रावची भूमिका अभिनेत्यासाठी एक टर्निंग पॉईंट दर्शवते, ज्यामुळे त्यांच्यामधील मानवतेला जागृत होते. तो KGF फ्रँचायझीमध्ये एका अंध व्यक्तीच्या भूमिकेत दिसला होता. २०१८ मध्ये KGF: Chapter 1 रिलीज झाल्यानंतर त्याने ३० चित्रपटांमध्ये काम केले आणि दुसऱ्या भागानंतर त्याने जवळ जवळ १५ चित्रपटांमध्ये काम केले.

मॅग्नम ओपसमधील आपल्या भुमिकेबद्दल बोलताना राव म्हणाले कि त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ४० चित्रपटांसाठी काम केले आहे. रावच्या म्हणण्यानुसार, त्याला ऑडिशनसाठी एक कॉल आला आणि त्यांच्या डायलॉग डिलिव्हरीने निर्मात्यांना इंप्रेस केले होते.

यशसोबत रावची छोटी भूमिका असली तरी त्याची भूमिका चित्रपटाचा आत्मा आहे. KGF Chapter २ ला क्रिटिक्स आणि दर्शकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यामधील प्रत्येक भूमिकेचे कौतुक केले गेले. चित्रपटाने यासच्या अभिनयापासून ते डायलॉग आणि अॅक्शन सीक्वेंसने दर्शकांच्या मनावर चांगली छाप सोडली.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आणि कन्नड चित्रपटासाठी एक बेंचमार्क सेट केला. KGF: Chapter २ कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळममध्ये रिलीज झाला होता. आता दर्शक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या प्रशांत नील श्रुती हासन आणि प्रभाससोबत सालार चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts