यश स्टारर चित्रपट केजीएफ बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. चित्रपटामधील प्रत्येक भूमिका दर्शकाच्या मनामध्ये घर करून बसली होती. आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ७० वर्षाचे कृष्णा जी राव यांचे निधन झाले आहे. ते आजारी होते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना बेंगलोरच्या एका हॉस्पीटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्या निधनाने चाहते दुखी आहेत.
माहितीनुसार कृष्णा जी राव हे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र ते यामधून बरे होऊ शकले नाहीत आणि त्यांचे निधन झाले. कृष्णा जी राव अनेक वर्षांपासून साऊथ साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय होते आणि त्यांनी ३० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते.
कृष्णा जी रावने केजीएफमध्ये एका अंध व्यक्तीची भूमिका केली होती. त्यांनी रॉकीच्या आतील माणुसकी जागृत केली, त्यानंतर कथा पूर्णपणे बदलली. त्यांचे डायलॉग खूप गाजले. कृष्णा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते कि त्यांना हि भूमिका कशी मिळाला होती.
त्यांनी म्हंटले होते कि मेकर्स द्वारे त्यांना कॉल केला गेला होता आणि त्यांना ऑडिशनसाठी बोलावले गेले होते. ज्यानंतर त्यांनी ऑडिशनमध्ये कमाल केली होती आणि आपल्या अभिनयाने सर्वांना इंप्रेस केले होते. ज्यानंत त्यान हि भूमिका मिळाली होती.
अभिनेता यश मुख्य भूमिकेमध्ये असलेला ह केजीएफ चित्रपट रॉकी (यश) नावाच्या एका व्यक्तीचे अनुसरण करतो, जो नंतर एक खतरनाक गँगस्टर बनतो, जो एका सोन्याच्या खाणीला नियंत्रित करतो. चित्रपटामध्ये दुसऱ्या भागामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधि शेट्टी, प्रकाश राज, मालविका अविनाश, जॉन कोकेन यांनी देखील मुख्य भुमिका केली होती.
ಕೆಜಿಎಫ್ ಅಭಿಮಾನಿಗಳಿಂದ ತಾತ ಎಂದೇ ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಿದ್ದ ಕೃಷ್ಣ ಜಿ ರಾವ್ ಅವರ ನಿಧನಕ್ಕೆ ಹೊಂಬಾಳೆ ಚಿತ್ರ ತಂಡದ ಸಂತಾಪಗಳು. ಓಂ ಶಾಂತಿ. pic.twitter.com/wOBfgZWBpy
— Hombale Films (@hombalefilms) December 7, 2022