HomeBollywood“माझा मूड चांगला करण्यासाठी विक्की तब्बल ४५ मिनिटं माझ्या...” कॅटरीनाने शेयर केला...

“माझा मूड चांगला करण्यासाठी विक्की तब्बल ४५ मिनिटं माझ्या…” कॅटरीनाने शेयर केला वाढदिवसाचा ‘तो’ किस्सा…

करण जौहरचा सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’चा १० वा एपिसोड रिलीज झाला आहे. या एपिसोडमध्ये कॅटरीना कैफ तिच्या फोन भूत चित्रपटामधील को-स्टार सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सोबत दिसली. शोदरम्यान कॅटरीनाने तिच्या पर्सनल लाईफसंबंधी अनेक खुलासे केले आणि विक्की कौशलसोबतच्या आपल्या लव्ह स्टोरीबद्दल देखील सांगितले. तिने हे देखील सांगितले कि एक पती म्हणून विक्कीने तिच्यासाठी काय काय केले जे तिच्यासाठी सर्वात जास्त स्पेशल होते.

शोमध्ये कॅटरीनाला जेव्हा करण जौहरने विचारले कि एक पती म्हणून विक्कीने तुझ्यासाठी काय काय केले जे सर्वात स्पेशल होते. यावर कॅटरीना म्हणाली कि मी कोविड दरम्यान खूपच वाईट काळामधून जात होते. यादरम्यान माझ्या वाढदिवशी मला खुश करण्यासाठी विक्कीने ४५ मिनिटे फक्त माझ्या गाण्यांवर डांस केला होता.

आमचा १७-१८ लोकांचा एक ग्रुप तिथे उपस्थित होता आणि सर्वजण मला फक्त इतकेच विचारत होते कि याला तुझ्याबद्दल सर्व काही कसे माहिती आहे. विक्कीचे हे सर्व करण्यामागे एक कारण होते कि मी खुश व्हावे आणि तसे घडले देखील. कॅटरीनाने इतके सांगितल्यानंतर बाजूला बसलेला ईशान खट्टर म्हणाला मी तुम्हाला विनंती करतो कि विक्की कौशलच्या शीला की जवानी किंवा चिकणी चमेली व्हर्जनला रिलीज करण्यात यावे. यावर कॅटरीनाने म्हणते कि मी तुला ते नंतर दाखवेन.

यानंतर जेव्हा करणने विचारले कि विक्कीची सर्वात चांगली गोष्ट काय आहे. तर कॅटरीना यावर म्हणते कि त्याचा कॉन्फिडेंस. त्याला माहिती आहे कि तो कोण आहे आणि काय करू शकतो. मला वाटते कि मी आजपर्यंत अशी व्यक्ती पाहिली नाही जी व्यक्ती स्वतःबद्दल इतकी एश्योर्ड आहे.

याआधी कॅटरीनाने शोमध्ये म्हंटले कि, विक्की माझ्या रडारमध्ये नव्हता. मला आधी त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. मी फक्त त्याचे नाव ऐकले होते. आम्ही कधी भेटलो नव्हतो आणि बोललो देखील नव्हतो. पण मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा त्याच्यावर फिदा झाले.

दोघे एका पार्टीदरम्यान भेटले होते. हि पार्टी चित्रपट निर्माती जोया अख्तरची पार्टी होती आणि हैराणीची बाब हि होती कि दोघांनी आपल्या एकमेकांच्या फिलिंग्सबद्दल जोया अख्तरला सांगितले होते. यानंतर विक्की आणि कॅटरीनाने एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts