HomeBollywoodतिसऱ्यांदा आई बनण्याच्या चर्चांदरम्यान आता करीना कपूरने व्यक्त केली मनातील खंत, म्हणाली;...

तिसऱ्यांदा आई बनण्याच्या चर्चांदरम्यान आता करीना कपूरने व्यक्त केली मनातील खंत, म्हणाली; खूपच वेदना…

करीना कपूर बी टाऊन ची सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सोशल मिडीयावर खूपच प्रसिद्ध आहे, तिच्याकडून आलेली प्रत्येक पोस्ट खूप वायरल होत असते. अलीकडेच तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम वरून योगा करतानाची एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिच्या योगाच्या आपल्या प्रवासाबद्दल कैप्शन मध्ये लिहिले आहे आणि लोकांसोबत शेअर केले आहे. या कैप्शन मध्ये तिने खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत.

करीना ने योगा करताना च्या फोटो सोबत लिहिले आहे की, “माझ्या साठी योगा चा प्रवास २००६ पासून सुरु झाला आहे, जेव्हा मी टशन आणि जब वी मेट साइन केली होती. यामुळे मी तंदुरुस्त आणि मजबूत बनले आहे. आता दोन मुलांच्या नंतर यावेळी मी खूप थकले आहे आणि वेदनांनी भरलेली आहे परंतु लवकरच हळू हळू परत माझी फिटनेस सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. माझी योगाची वेळ ही माझी वेळ असते. सातत्य हा मंत्र आहे.”

करीनाची ही पोस्ट तिच्या चाहत्यांसाठी एका नवीन उत्साह घेऊन येणारी आहे. करीनाच्या चाहत्यांसोबत बॉलीवूड मधील काही सेलिब्रिटी देखील या पोस्ट ला खूप पसंद करत आहेत. कैटरिना कैफ ने देखील या पोस्ट ला लाईक केले आहे.

लक्षणीय हे आहे की करीनाच्या या पोस्टच्या आधी आंतरराष्ट्रीय योगा डे च्या निमित्ताने तिने तिच्या इंस्टा स्टोरी वर तिचा एक जुना फोटो ठेवला होता. ज्यात एक पाय वर करून करीना समुद्र किनारी पांढऱ्या कलर च्या बिकिनी मध्ये योगा करताना दिसत आहे. या फोटो च्या कैप्शन मध्ये करीना ने लिहिले आहे की आपल्या डोक्याला मोकळे सोडा.

प्रत्यक्षात करीना कपूर ने अलीकडेच २१ फेब्रुवारी ला तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. आपल्या फिटनेस वर जास्त लक्ष देणारी करीना प्रेग्नन्सी च्या थोड्या दिवसांनंतर व्यायाम सुरु केला होता. त्यावेळी कायम तिला घराच्या आसपास फिरताना पाहायला मिळत असे. करीनाला लवकरच चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. तथापि ती आत्ता आपला वेळ जास्तीत जास्त कुटुंबासोबत घालवत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts