HomeBollywoodएयरपोर्टवर एकट्या करीनाला गर्दीचा गराडा, तिची बॅग ओढली, तिला धक्काबुक्की केली आणि...

एयरपोर्टवर एकट्या करीनाला गर्दीचा गराडा, तिची बॅग ओढली, तिला धक्काबुक्की केली आणि तिच्या…

सेलेब्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मग जेव्हा कधी अशी संधी येते तेव्हा चाहते स्टारसोबतचे आपला फोटो कॅमेऱ्यात कैद करायला विसरत नाहीत. पण कधी कधी चाहत्यांचा क्रेजीपणा इतका वाढतो कि त्यामुळे सेलिब्रिटी घाबरून जातात. करीना कपूरला देखील अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे.

सोमवारी सकाळी करीना कपूरला एयरपोर्टवर स्पॉट केले गेले. तिच्या आगामी चित्रपटासाठी ती लंडनला रवाना होत होती. करीना जेव्हा एयरपोर्टवर आपल्या गाडीमधून उतरली तेव्हा गर्दीने तिला घेरले. करीनासोबत सेल्फी घेण्यासाठी लोक क्रेजी झाले.

करीनासोबत धक्काबुक्की करू लागले. करीनाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागले. करीनाला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक इतके उतावळे झाले कि त्यामुळे अभिनेत्री अनकंफर्टेबल फील झाले. करीना कपूरची कोणी बॅग खेचली तर कुणी जबरदस्तीने तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी तिच्याजवळ येताना दिसले.

करीनाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक फ्रेम अशी देखील आहे ज्यामध्ये ती आपल्या चाहत्यांची अशी हरकत पाहून घाबरलेली दिसत आहे. पण गर्दीमध्ये अडकलेल्या करीनान आपला संयम कायम ठेवला. करीनाने इतके सर्व झाल्यानंतर देखील चाहत्यांना निराश केले नाही.

कधी हस्त तर कधी पाउट बनवून ती पोज देऊ लागली. जितका संयम करीनाने यादरम्यान दाखवला आहे त्यामुळे लोक तिचे खूपच कौतुक करत आहेत. सोशल मिडियावर युजर्सने चाहत्यांना नम्रपणे वागण्याचा सल्लाही दिला आहे. एअरपोर्टवर करीना कुल लुकमध्ये पोहोचली होती. ती व्हाइट स्वेटर, व्हाइट टी-शर्ट आणि व्हाइट ट्रॅकपँटमध्ये दिसली.

करीना लंडन दिग्दर्शक हंसल मेहताच्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी निघाली आहे. हा मर्डर थ्रिलर आहे ज्याला करीना कपूर प्रोड्यूस देखील करत आहे. याशिवाय करीना द डिवोशन ऑफ सस्पेक्ट X च्या हिंदी व्हर्जनमध्ये देखील दिसणार आहे. करीनाचा लाल सिंह चड्ढा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts