कंगना रनौत आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाला अविस्मरणीय बनवण्यासाठी, अभिनेत्री अंबिका देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी उदयपूरमधील तिच्या कुलदेवीच्या मंदिरात पोहोचली. कंगनाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे, ज्यामध्ये ती या खास दिवशी पूजा करताना पाहायला मिळत आहे.
कंगना रनौतला तिच्या वाढदिवशी अंबिका देवीचे आशीर्वाद मिळाल्याने धन्य वाटले. विशेष म्हणजे अभिनेत्रीने उपवास देखील केला होता, कारण तिचा वाढदिवस चैत्र नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी येतो. कंगना ग्रीन कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
कंगनाने व्हिडीओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि माझा वाढदिवस द्वितीया नवरात्रीला येतो, मी उपवास करत आहे, मी उदयपूरमधील आमच्या कुलदेवी अंबिकाजीच्या मंदिरात गेले आणि तिथे पूजा केली, सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा…
कंगना रनौतची हि पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एका युजरने लिहिले आहे कि मी तुमची सर्वात मोठी फॅन आहे. तर एका दुसऱ्या युजरने नवरात्रीच्या शुभेच्छा देत देव तुम्हाला आशीर्वाद देवो असे लिहिले आहे. कंगना रनौत तिहया आगामी इमरजेंसी चित्रपटामध्ये दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन तिने स्वतः केले आहे. तर चंद्रमुखी २ चित्रपट देखील लवकरच रिलीजसाठी तयार होणार आहे.
View this post on Instagram