बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांचा लग्नानंतर घटस्फोट झाला आहे आणि त्या त्यांच्या जोडीदारापासून वेगळे राहतात. लग्नानंतर घटस्फोट एक सामान्य गोष्ट झाली आहे, परंतु लग्नाशिवाय आई झालेल्या अभिनेत्री आजही क्वचितच पाहायला मिळतात.
पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, ज्या त्यांच्या व्यावसायिक जीवनापेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनाला घेऊन कायम चर्चेत येत असतात. एवढेच नाही तर, त्यांच्या जीवनातही खूप उलथापालथ झाली आहे. आज कल्की कोचलीन चा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या बद्दल सांगणार आहोत.
कल्की च्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलाल तर तिचे लग्न प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप सोबत झाले होते. या लग्नाच्या मागची गोष्ट देखील काही कमी प्रसिद्ध नाही. मिडिया रिपोर्टनुसार चित्रपट ‘देव डी’ च्या चित्रिकरणादरम्यान कल्की आणि अनुराग कश्यप यांच्यात जवळीकता वाढत गेली. चित्रपट ‘देव डी’ मध्ये कल्की अभिनेत्री होती तर, अनुराग चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
विशेष म्हणजे काही वर्ष एकमेकांना डेट केल्या नंतर २०११ मध्ये कल्की आणि अनुराग यांनी लग्न केले. कल्की अनुराग पेक्षा १४ वर्षांनी लहान होती. लग्नावेळी तिचे वय फक्त २५ वर्ष होते तर अनुराग चे वय ३९ वर्ष होते. तथापि, लग्नाच्या काही वर्षांच्या नंतर म्हणजे २०१३ मध्ये त्यांच्यातील मतभेदामुळे कल्की आणि अनुराग एकमेकांच्या पासून वेगळे राहू लागले. तर वर्ष २०१५ मध्ये एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला होता.
अशाप्रकारे फक्त लग्नच नाही तर चार वर्षांमध्ये घटस्फोट देखील चकित करणारा होता. कल्की ने तिच्या करिअर ची सुरुवात वर्ष २००९ मध्ये चित्रपट देव डी मधून केली होती. तिला या चित्रपटासाठी फिल्म फेअर बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री चा अवोर्ड देखील मिळाला होता. त्यानंतर तिने बॉलीवूड मधील अनेक प्रसिद्ध मल्टीस्टार चित्रपटांमध्ये काम केले आहे. वर्ष २०१४ मध्ये चित्रपट मार्गारिटा विथ ड स्ट्रो टेलीन ब्लैक नाईटस चित्रपट महोत्सवामध्ये तिला सर्वश्रेष्ठ चित्रपट चा पुरस्कार मिळाला होता. असे पहिल्यांदाच घडले होते कि बॉलीवूड चित्रपटाचे स्क्रीनिग टेलीन ब्लैक नाईटस चित्रपट महोत्सवामध्ये झाले होते.
अनुराग सोबत वेगळे झाल्या नंतर कल्की ने बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग ला डेट केले आणि ती त्याच्या सोबत रिलेशनशिप मध्ये देखील होती, त्यादरम्यान ती गरोदर देखील झाली होती. लग्नाच्या अगोदर गरोदर पणामुळे कल्की खूपच चर्चेत आली होती. कल्की ला फ्रेंच व्यतिरिक्त हिंदी, इंग्लीश आणि तमिळ भाषा देखील चांगल्या प्रकारे येतात.
कल्की तिच्या बेधडक वक्तव्यामुळे देखील ओळखली जाते. एका मुलाखतीमध्ये तिने केलेल्या वक्तव्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आहे. आपल्या खासगी लाईफविषयी खुलासा करताना अभिनेत्री म्हणाली होती कि तिशी नंतर माझी से क्स लाईफ खूपच चांगली आहे. मला माझ्या शरीराची जरादेखील लाज वाटत नाही. मी आता बेडवर आधीपेक्षा खूपच स्वार्थी आहे.
View this post on Instagram