बॉलीवूड अभिनेत्री काजोलने आपला नवीन प्रोजेक्ट साईन केला आहे. द गुड वाइफ या सुपरहिट शोच्या हिंदी रिमेकमध्ये काजोल पाकिस्तानी अभिनेता अली खानसोबत पाहायला मिळणार आहे. एका मुलाखतीमध्ये अली खानने काजोलसोबत किसिंग सीन शूट करण्याबाबत खुलेपणाने सांगितले. अली म्हणाला कि काजोल तिचे लहानपणापासूनचे प्रेम आहे.
अलीने म्हंटले कि काजोल बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री आहे जिच्यावर त्याचे क्रश राहिले आहे. नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये अलीने शाहरुख खानसोबत करण्यासोबत आणि द आर्चीज या मल्टी स्टारर चित्रपटाबद्दल देखील बातचीत केली होती. अली खानच्या काजोलबद्दलच्या आकर्षनाबद्दल बोलायचे झाले तर त्याने म्हंटले कि मी जेव्हा लहान होतो तेव्हा काजोल माझी फेवरेट अभिनेत्री होती.
अली खान म्हणाला कि गेल्या ३ दशकापासून मी तिचे काम पाहत आहे नि मी ऐकले होते कि काजोल खूप रागीट स्वभावाची आहे. आता एका सिरीजचे शुटींग पूर्ण केल्यानंतर तिला जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. अली खानने सांगितले की, या मालिकेत त्याने काजोलच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. यात त्याच्यासोबत माझा एक किसिंग सीनही आहे.
अली खान म्हणाला- हा एक स्मूच सीन आहे ज्याला तुम्ही फ्रेंच किस देखील म्हणू शकता. त्याने सांगितले कि हा सीन शूट झाला तेव्हा अजय देवगन सेटवर नव्हता. त्याने तीन ते चार दिवस काजोलसोबत सीनचा सराव केला. सीन परफेक्ट झाल्यानंतर दिग्दर्शक खुश झाला आणि काजोलला देखील त्याचे आभार मानले.