९० च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये एंट्री घेणारी काजोलचा रंग पाहून आज देखील लोक हैराण होतात. वास्तविक बॉलीवूड डेब्यूच्या वेळी काजोलचा रंग सावला होता पण काळासोबत तिचा रंग देखील बदलत गेला. आज काजोल सावली नाही तर गोरी दिसते. यामागे कोणते कारण आहे हे आजपर्यंत कोणालाच माहिती झालेले नाही. आता स्वतः काजोलने याचे सिक्रेट रीवील केले आहे.
काजोलने सोशल मिडियाद्वारे हे सिक्रेट रीवील केले आहे कि ती काळानुसार गोरी कशी होत गेली. वास्तविक काजोलने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेयर केली ज्यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला दिसत आहे. तिने चेहऱ्यावर ब्लॅक मास्क लावला आहे आणि डोळ्यांवर ब्लॅक चष्मा लावला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काजोलने लिहिले कि – त्या सर्वांसाठी जे मला विचारतात कि तू इतकी गोरी कशी झालीस. यासोबत तिने #Sunblocked #SPFunbeatable हॅशटॅग लावले आहेत आणि एक हसणारा इमोजी टाकला आहे.
काजोलने १९९२ मध्ये बेखुदी चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता ज्यामध्ये तिचा रंग खूपच सावला पाहायला मिळाला होता. यानंतर ती बाजीगर, ये दिल्लगी,करण अर्जुन,गुंडाराज, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. पण जेव्हा अनेक वर्षांनंतर ती कभी खुशी कभी गम चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर दिसली तेव्हा तिचा बदललेला रंग पाहून दर्शक हैराण झाले होते.
लोकांना यावर विश्वासच बसला नाही कि ती काजोल आहे. सोशल मिसियावर असे म्हंटले जाते कि काजोलने मेडिकल ट्रीटमेंटद्वारे आपला नॅचरल कलर बदलला. पण आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सर्व संभ्रम दूर करत यामागचे खरे कारण समोर आणले आहे.