HomeViralभारती महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू प्रियांका नेगीने केला साखरपुडा, पहा साखरपुड्याचे...

भारती महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू प्रियांका नेगीने केला साखरपुडा, पहा साखरपुड्याचे फोटोज…

२०१६ मध्ये वीरभद्र सरकारच्या कार्यकाळात प्रियांका नेगी हिमाचल पोलिसात तैनात झाली होती. तिला स्पोर्ट कोट्यामधून हिमाचल पोलीसामध्ये नोकरी मिळाली होती. भारती महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू प्रियांका नेगीने साखरपुडा केला आहे. सिरमौर जिल्ह्यातील शिल्लई येथील डॉ. सौरभ शर्मा यांच्याशी प्रियांकाचा साखरपुडा झाला आहे.

२०१६ मध्ये वीरभद्र सरकारच्या कार्यकाळात प्रियांका नेगी हिमाचल पोलिसात तैनात झाली होती. तिला स्पोर्ट कोट्यामधून हिमाचल पोलीसामध्ये नोकरी मिळाली होती. माहितीनुसार प्रियांका नेगी सिरमौर जिल्ह्यातील शिल्लई येथील रहिवाशी आहे आणि सध्या ती हिमाचल पोलिसात इंस्पेक्टर पदावर कार्यरत आहे.

प्रियांकाचा साखरपुडा हिमाचल प्रदेशचे बिलासपुर जिल्ह्यातील रहिवाशी डॉक्टर सौरभ शर्मासोबत झाला आहे. सौरभ बिलासपुर हॉस्पिटलमध्ये स्किन स्पेशेलिस्ट आहे. प्रियांका नेगी २००६ पासून हॉस्टल बिलासपुर येथे कबड्डीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर भारतीय संघामध्ये सामील झाली होती.

प्रियांका २०११ मध्ये श्रीलंकामध्ये साऊथ एशियन गेम्स, २०१२ मध्ये पटनामध्ये फर्स्ट वुमन कबड्डी वर्ल्ड कप आणि २०१३ मध्ये चीनमध्ये थर्ड एशियन बीच गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या टीममध्ये सामील होती. याशिवाय राष्ट्रीय खेळांमध्ये तिने जवळ जवळ १५ मेडल जिंकले आहेत.

२०१२ मध्ये प्रियांका नेगीला परशुराम अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. तिचे वडील कंवर सिंह नेगी शेतकरी आहेत तर आई सुनिता नेगी गृहिणी आहे. सिरमौरच्या नाहनमध्ये एका खासगी हॉटेलमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे फोटो प्रियांकाने सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Negi (@priyanka_negi7)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts