टीव्हीवरील प्रसिध्द अभिनेत्री रुबीना दिलैकची बहिण ज्योतिका दिलैक विवाहबंधनात अडकली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड रजत शर्मा शिमलासोबत हॉटेलमध्ये लग्न केले. लग्नामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि काही जवळचे मित्र सामील होते. ज्योतिकाने लग्नानंतरचे फोटो स्वतः चाहत्यांसोबत शेयर केले आहेत.
ज्योतिका दिलैक व्हिडिओ क्रिएटर आहे आणि रजत शर्मा देखील व्हिडिओ क्रिएटर आहे. दोघांना फिरण्याची आवड आहे, ज्यामुळे दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांतर त्यांनी लग्न केले. ज्योतिका दिलैक लाल लेहेंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिने आपल्या लग्नाच्या लुकला पारंपारिक दागिन्यांनी पूर्ण केले होते.
View this post on Instagram
रजत शर्माने स्पेशल डे साठी ब्लू कलरच्या शेरवानीची निवड केली होती. तो नेहमीसारखा हँडसम दिसत होता. राजन घोड्यावर बसून ज्योतिका नेण्यासाठी पोहोचला. ज्योतिका दिलैक आणि रजत शर्मा यादरम्यान खूपच खुश दिसले. दोघांनी रोमँटिक अंदाजामध्ये पोज देखील दिल्या.
View this post on Instagram
बहिण ज्योतिकाच्या लग्नामध्ये रुबिना दिलैक तिचा पती अभिनव शुक्लासोबत पोहोचली होती. अभिनव आणि रुबिना देखल लग्नांच्या रंगामध्ये पाहायला मिळाले. ज्योतिका दिलैकने लग्नाचा पहिला फोटो शेयर करत लिहिले आहे कि, ०९/०३/२३ ज्योतिका आणि रजत. याशिवाय तिने हॅशटॅगसह कपल, ज्योतिका आणि रजत, कपल गोल, वेडिंग लिहिले आहे.
ज्योतिका दिलैकने याआधी हळदी सेरेमनीचे फोटो देखील शेयर केले होते. तिची हळदी सेरेमनी होळीच्या दिवशी होती. रजत आणि ज्योतिका एकमेकांना हळद लावताना देखील दिसले. या फोटोंमध्ये रजत शर्मा आणि ज्योतिका खूपच क्युट दिसत होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram