साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आणि राजकारणी नंदमुरी तारक रत्न यांचं शनिवारी निधन झाले. ते ३९ वर्षाचे होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. निधनानंतर त्याचेह पार्थिव अंत्यविधीसाठी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले आहे.
हैदराबादमधल्या मोकिला स्थित त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या चुलत भाऊ ज्युनियर एनटीआर, भाऊ नंदमुरी कल्याणराम आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकार पोहोचले आहेत. सध्या नंदमुरी तारक रत्न यांचा चुलत भाऊ ज्युनियर एनटीआरला आणि भाऊ नंदमुरी कल्याण राम यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते भावाच्या निधनामुळे पूर्णपणे खचल्याचे दिसत आहेत. त्यांना शोक अनावर झाला आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेते आणि टीडीपी नेते नंदमुरी तारका रत्न यांचं शनिवारी बेंगलोर येथे निधन झाले. त्यांच्या ४० व्या वाढदिवसाच्या अवघ्या ४ दिवस अगोदरच त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या महिन्यामध्ये आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम येथील पदयात्रेदरम्यान त्यांना कार्डिॲक अरेस्ट आल्यामुळे ते बेशुद्ध होऊन कोसळले होते.
ज्यानंतर त्यांना त्वरित बेंगळुरूमधील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. तारका रत्न यांच्या निधनाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. चिरंजीवी, राम चरण, अल्लू अर्जुन, महेश बाबू, श्री विष्णू यांच्यासोबत अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या निधनावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
తారకరత్న గారి భౌతిక కాయాన్ని సందర్శించి
నివాళి అర్పించిన @tarak9999 మరియు @NANDAMURIKALYAN అన్న 💔😭#RIPTarakaRatna
pic.twitter.com/sYMnIoQEbB— Nandipati Murali (@NtrMurali9999) February 19, 2023