HomeEntertainmentJr. NTR चा भाऊ तारक रत्नचे निधन, हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये करण्यात...

Jr. NTR चा भाऊ तारक रत्नचे निधन, हृदयविकाराचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते दाखल…

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. Jr. NTR चा भाऊ नंदमुरी तारक रत्नचे निधन झाले आहे. तो एक प्रसिद्ध अभिनेता तर होताच त्याचबरोबर राजनेता देखील होता. जानेवारीमध्ये कुप्पममध्ये एका रॅलीदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता ज्यानंतर त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. शनिवारी त्यांनी हॉस्पिटलमध्ये अंतिम श्वास घेतला.

तारक रत्ना RRR चित्रपटाचा अभिनेता जूनियर एनटीआरचा चुलत भाऊ आहे. तो कल्याण राम आणि लोकेश केचा देखील लहान भाऊ आहे. त्याचबरोबर पूर्व मुख्यमंत्री एनटी रामारावचा नातू आणि तेलगु फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता बालकृष्ण नंदमुरीचा भाचा देखील आहे.

तारक रत्नच्या मृत्यूनंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. चित्रपटा जगतामधील अनेक दिग्गजांनि शोक व्यक्त करत आपल्या संवेदना शेयर केल्या आहेत. तारक रत्नचे चाहते देखील सोशल मिडियावर त्यांच्यासाठी श्रद्धांजलि अर्पित करत आहेत. तेलगु अभिनेता चिरंजीवी आणि फिल्म निर्माता अल्लारी नरेशने देखील ट्वीट करून तारक रत्नच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

२८ जानेवारी रोजी तारक त्यांच्या चुलत भाऊ नारा लोकेशसोबत चित्तूर जिल्ह्यामधील कुप्पम भागामध्ये पदयात्रा करत होते. यादरम्यान ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना त्वरित कुप्पम येथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि तेव्हापासून त्यांच्या डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांच्यावर देखरेख करत होती.

तारक रत्नाचे पूर्ण नाव नंदमुरी तारक रत्ना आहे. त्यांनी २००३ मध्ये ओकाटो नंबर कुर्राडू या चित्रपटामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. आतापर्यंत ते अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करताना पाहायला मिळाले तर काही चित्रपटांमध्ये त्यांनी विलेनची भूमिका देखील केली. कय्युम भाई, देविनेनी, सारधी त्यांचे रिसेंट चित्रपट आहेत. याशिवाय त्यांनी 9 Hours नावाच्या वेब सिरीजमध्ये देखील काम केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts