पठाण चित्रपटामध्ये विलेनची भूमिका करून चर्चेमध्ये आलेला जॉन अब्राहमला आज कोणाच्याही ओळखीची गरज नाही. आज आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळ जवळ दोन दशके घालवलेल्या जॉनच्या डेब्यू चित्रपटाशी संबंधित एक किस्सा जाणून घेणार आहोत.
जॉन अब्राहमने २००३ मध्ये रिलीज झालेल्या जिस्म चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहमच्या अपोजिट बिपाशा बसु मुख्य भूमिकेमध्ये होती. चित्रपटामध्ये जॉन आणि बिपाशावर खूपच बोल्ड सीन शूट केले गेले होते. या या चित्रपटाची निर्मिती पूजा भट्टने केली होती.
आजच्या काळाप्रमाणे २००३ मध्ये इंटीमेसी कोआर्डिनेटर नव्हते. अशामध्ये अभिनेता आणि अभिनेत्री कम्फर्ट नुसार सीन शूट करायचे. यादरम्यान जेव्हा जिस्म चित्रपटाची शुटींग सुरु होती तेव्हा इंटीमेट सीन्सच्या शूटदरम्यान पूजा भट्ट नेहमी याची काळजी घ्यायची कि बिपाशा बसू संपूर्ण युनिटसमोर असे हॉट सिन्स देण्यास कम्फ़र्टेबल आहे का नाही. यादरम्यान एका अशाच सीनच्या शुटींग दरम्यान पूजाने बिपाशाला विचारले होते कि तू हे करण्यास कम्फ़र्टेबल आहेस का? पूजाच्या या प्रश्नावर जॉनने देखील एक प्रश्न विचारला होता.
वास्तविक जॉनने पूजाला अचानक प्रश्न विचारला होता कि…आणि माझ्या कम्फ़र्टबद्दल काय? हा प्रश्न ऐकल्यानंतर पूजा थक्क झाली होती आणि तिने मानले देखील होते कि आतापर्यंत एक महिला म्हणून असे वाटते कि इंटीमेट सीन्सच्या शूटिंग दरम्यान फक्त महिलाच अनकम्फ़र्टेबल फील करतात. २००३ मध्ये रिलीज झालेला जिस्म चित्रपट सुपरहिट झाला होता आणि ज्यानंतर २०१२ मध्ये जिस्म २ बनवण्यात आला होता.