HomeBollywood“त्यानं अंगावरचा टॉप अन् ब्रा...” जिया खानच्या बहिणीचे साजिद खान विरुद्ध धक्कादायक...

“त्यानं अंगावरचा टॉप अन् ब्रा…” जिया खानच्या बहिणीचे साजिद खान विरुद्ध धक्कादायक वक्तव्य…

बिग बॉस १६ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे त्यातील काही स्पर्धकांना घेऊन. त्यातीलच एक नाव आहे साजिद खान याचे, ज्यामुळे लोकांच्यात खूपच निराशा दिसत आहे. कलर्स टीवी वरील या शो मध्ये मिटू मधील आरोपी साजिद खान ला घेतल्याबद्दल सोशल मिडीयावर लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. मिटू च्या दरम्यान साजिद खान वर ज्या ज्या अभिनेत्रींनी लैं गि क अत्याचाराचा आरोप केला होता त्यामध्ये सलोनी चोपडा, मंदाना करिमी, अहाना कुमरा यांचा समावेश होता. आता जे नाव समोर आले आहे त्यामध्ये जिया खान ची बहिण करिष्मा चे नाव देखील आले आहे. करिष्मा ने आपल्या डॉक्युमेंटरी मध्ये त्या वाईट अनुभवांची कथा सांगितली आहे जेव्हा ती बहिण जिया खान सोबत तिच्या घरी जात होती.

जिया खान जी आता या जगात नाही आहे, तिची बहिण करिष्मा ने दिग्दर्शक साजिद खान सोबतचा आपला भयानक अनुभव बीबीसी ची डॉक्युमेंटरी ‘डेथ इन बॉलीवूड’ मध्ये सांगितला आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या या डॉक्युमेंटरी मध्ये करिष्मा ने सांगितले की साजिद खान सोबत तिचा कसा वाईट अनुभव राहिला आहे. १६ वर्षांची होती त्यावेळी साजिद ने तिच्या बद्दल केले होते असे घाण वक्तव्य.

या डॉक्युमेंटरी मध्ये जिया खान ची बहिण करिष्मा खान ने सांगितले,’ही एक तालीम होती, ती स्क्रिप्ट वाचत होती आणि साजिद ने तिला तिचा टॉप आणि ब्रा काढायला सांगितले. जिया ला काही माहित नव्हते की काय करावे. ती म्हणाली अजून तर चित्रपटाचे चित्रीकरण सुरु देखील झालेले नाही आणि असे होत आहे. ती घरी जावून खूप रडली होती.

जिया खान ला शेवटी चित्रपट करावा लागला, ज्याच्या सोबत करार होता. जिया त्यावेळी कायदेशीर अडचणींना घाबरत होती. तथापि, सर्वात वाईट तेंव्हा झाले जेव्हा साजिद खान ने करिष्मा कडे देखील आपले पाय वळवले. या घटनेची आठवण करताना करिष्मा ने सांगितले की, ‘मला आठवते की जेव्हा मी माझ्या मोठ्या बहिणी सोबत साजिद खान च्या घरी जात असे. मला आठवते की मी स्वयपाक घरातील टेबल जवळ होते आणि त्यावेळी मी फक्त १६ वर्षांची होते. मी फक्त एक स्ट्रेपी टॉप घातला होता आणि टेबल वर वाकले होते. तो मला लांबूनच पाहत होता आणि म्हणाला ‘ओह शी वोन्टस सेक्स आणि हे ऐकताच माझी बहिण लगेच माझ्या बचावासाठी आडवी आली आणि म्हणाली, नाही, तू हे काय बोलत आहेस. तो म्हणाला, पहा ती कश्या प्रकारे बसली आहे. तिची बहिण म्हणाली, माझी बहिण खूपच साधी आहे, ती खूप लहान आहे, तिला माहिती नाही की तिला काय हव आहे. आणि लगेच आम्ही तिथून बाहेर पडलो.

तथापि, बिग बॉस १६ स्पर्धकांच्या यादीत लहान मोठे कलाकार आणि सामान्य लोकांच्यात साजिद खान च्या येण्याने प्रेक्षक खूपच चकित झाले. साजिद खान च्या आगमनाने सोशल मिडियावर लोक म्हणत आहेत की तो आपली प्रतिमा सुधारण्यासाठी या शो मध्ये आलेला आहे. सध्यातरी शो मध्ये साजिद खान ज्याप्रकारे डाव खेळत आहे ते पाहून असे वाटते की लोकांचे हे बोलणे खरे होताना दिसत आहे. साजिद खान प्रत्येक स्पर्धकासोबत चांगले वागण्याचा प्रयत्न करत आहे. आता पाहावे लागणार आहे की बिग बॉस १६ मध्ये जावून लोकांच्या चांगल्या चांगल्या प्रतिमा खराब होतात पण काय साजिद खान आपली प्रतिमा सुधारण्यात यशस्वी होईल काय?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts