अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आ त्मह त्येचे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही तोवर मनोरंजनसृष्टीमधून क्षेत्रातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंडची अभिनेत्री रिया कुमारीची गो ळ्या झाडून ह त्या करण्यात आली आहे. अबिनेत्री रिया कुमारी झारखंडच्या एका लोकल वह चलचित्र सिरीयलमधून अभिनेत्री होती. ती एक लोकप्रिय यूट्यूबर देखील होती.
पश्चिम बंगालच्या महामार्गावर हि खळबळजनक घटना घडली आहे. रिया कुमारी पती प्रकाश कुमारसोबत गाडीमध्ये प्रवास करत होती. तेव्हा काही चोरट्यांनी तिच्या पतीला लुटण्यास सुरुवात केली. दरम्यान चोरट्यांना थांबवण्यासाठी मध्ये आली. तेव्हा चोरट्यांनी तिच्यावर गो ळ्या झाडल्या.
यादरम्यान अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. रिया कुमारीचे कुटुंब हावडामार्गे कोलकाताला जात होते. गाडीमध्ये तिचा पती प्रकाश कुमार आणि अडीच वर्षाची मुलगी देखील होती. अभिनेत्रीचे पती गाडी चालवत होते. बुधवारी सकाळी ६ वाजता बग्नानच्या महेश खेडा ब्रिजच्या जवळ गाडी थांबल्यानंतर काही चोरट्यांनी त्यांच्यावर लुटमार करण्याचा प्रयत्न केला.
रियाने थांबण्याच्या प्रयत्न केला तेव्हा तिच्यावर चोरट्यांनी गो ळी झाडली. घटनेनंतर कोणीही जवळपास न दिसल्यामुले तिच्या पतीने गाडी चालवत राजापूर पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी मृ तदे ह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
रिया कुमारचे पती प्रकाश कुमार चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक शॉर्ट आणि अॅड फिल्म्स बनवल्या आहेत. ते मायनिंगचा देखील व्यावसायक करतात. या घटनेनंतर हावडा ग्रामीणच्या पोलीस स्वाती म्हणाल्या कि आम्ही लोक पडताळणी करत आहोत. परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. प्रकाश यांच्याबाबत ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जाऊन री-कंस्ट्रक्शन करण्याचा प्रयत्न करू.