HomeBollywoodकंगना राणावत आणि ‘जया बच्चन’चा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, जया बच्चनने...

कंगना राणावत आणि ‘जया बच्चन’चा ‘तो’ व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, जया बच्चनने कंगनाची…

बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चनचा अपकमिंग चित्रपट ऊंचाई ची बुधवारी रात्री स्पेशल स्क्रीनिंग ठेवली होती. या इवेंटमध्ये कंगना राणावत, अभिषेक बच्चन सहित अनेक सेलेब्स सामील झाले होते. आता या स्क्रीनिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कंगनाला जया बच्चन इग्नोर करताना पाहायला मिळाली.

स्क्रीनिंगमध्ये जया बच्चन आधी पोहोचली तर तिच्या मागे कंगना देखील दिसली. जिथे एकीकडे पॅप्स कंगना-कंगना ओरडत होते, तर दुसरीकडे जया, कंगनाला स्पष्ट दुर्लक्ष करत येते आणि भाग्यश्रीला मिती मारते. त्यानंतर जेव्हा कंगनाने जयाला नमस्कार केला तेव्हा ती कोणतीही रिअॅक्शन न देता पुढे जाते. व्हिडीओमध्ये अनुपम खेर, जयाला कंगनाला भेटण्यासाठी सांगतो पण ती पाठ फिरवते.

या व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी जयाला लगेच नोटीस केले आणि त्यांच्या नजरा यावर टिकल्या. जिथे एका युजरने लिहिले आहे कि, कंगनाला कोणाचीही गरज नाही, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि, जया बच्चन एक असभ्य महिला आहे. काहींनी म्हंटले कि कंगना विचार करत असेल कि ज्या बच्चन इथे देखील आली. या स्क्रीनिंगचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिषेक बच्चन कंगनाला मिठी मारताना दिसतो आणि तिच्यासोबत चेष्टा मस्करी करतो.

चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये कंगना आणि जयाशिवाय इतर अनेक कलाकार देखील सामील झाले. यामध्ये राणी मुखर्जी, काजोल, सलमान खान, रितेश देशमुख आणि शहनाज गिल देखील होते. ऊंचाई चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ताशिवाय परिणीति चोप्रा, अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा आणि सारिका यांच्या मुख्य भूमिका आहेत. सूरज बडजात्या दिग्दर्शित हा चित्रपट चार मित्रांमधील एक स्टोरी आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts