जान्हवी कपूर आपल्याच एका व्हिडीओमुळे सध्या सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. जान्हवीने स्वतः हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. यामध्ये काहीच शंका नाही कि जान्हवी कपूर बॉलीवूडमधील सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
जान्हवी कपूर नेहमी आपल्या वर्कआउट दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असते. दरम्यान तिच्या लेटेस्ट व्हिडीओमुळे तिला ट्रोल व्हावे लागत आहे. जिथे काही लोकांना अभिनेत्रीच्या व्हिडीओने जिम जाण्यासाठी प्रेरित केले तर काही नेटिजन्स तिला ट्रोल करू लागले.
गुरुवारी स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणा जान्हवी कपूरने एक व्हिडीओ शेयर केला आहे. जिथे अनेक चाहत्यांना तिच्या वर्कआउटचा व्हिडीओ खूपच आवडला तर अनेकजणांनी अभिनेत्रीला विनाकारण ट्रोल केले. तुम्ही जान्हवीच्या व्हिडीओमध्ये पाहू शकता कि तो जिम आउटफिटमध्ये स्ट्रेचिंग पासून डंबेल उचलण्याचा आणि लेग एक्सरसाइज पर्यंत वेगवेगळे वर्कआउट करताना दिसत आहे.
जान्हवीने हा व्हिडीओ शेयर करताच लोकांनी तिचं व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले कि कदाचित इतकी मेहनत ती अभिनयामध्ये देखील केली असती तर किती बरे झाले असते. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे कि आता मला सेलेब्रिटी जिम ट्रेनर बनावे लागेल, कमी पैसे मिळतील पण खुश राहीन.
२५ वर्षाची जान्हवी कपूर नेहमी आपल्या बोल्ड आणि सिजलिंग लुकने चाहत्यांना घायाळ करत असते. याशिवाय सध्या ती शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत. तथापि जान्हवी आणि शिखर दोघांनी आपल्या रिलेशनबद्दल कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच वरुण धवनसोबत बवाल चित्रपटामध्ये आणि राजकुमार राव स्टारर चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय जान्हवी कपूरकडे करण जोहरचा दोस्ताना २ आणि बडे मियाँ छोटे मियाँ’ सारखे मोठे चित्रपट देखील आहेत.
View this post on Instagram